shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व कोविड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थी सत्कार व आशा स्वयंसेविका यांना  कोविड योद्धा पुरस्कार देऊन इंदापूर पंचायत समिती येथील अल्प बचत  सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र  रेडके, तेज पृथ्वी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा सौ अनीताताई नानासाहेब खरात यांच्या प्रमुख  उपसथितीमध्ये हा सोहळा पार पडला . 
प्रास्ताविक  तेजपृथ्वी ग्रुपच्या महिला अध्यक्ष अर्चना गोरड यांनी  केले.
 तसेच कार्यक्रमात   अनिताताई खरात,महेंद्र रेडके, श्रीमंत घोडके राहुल नाकाडे  दुर्योधन पाटील यांनी  आपले विचार मांडले .

 नानासाहेब खरात यांनी आशा स्वयंसेविका यांचा  कार्याचा   उलेख करून आशा सेविका बरोबर कायम राहू, त्यांच्या  सर्व अडचणीत तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू अशी हमी दिली .
 इंदापूर पंचायत समिती  उपसभापती संजय दहाडे,वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे,हनुमंत यमगर, उपसरपंच दत्ताभाऊ पांढरे, महादेव पांढरे, ग्राम पंचायत सदस्य गोकुळ कोकरे, गणेश भाळे दिनेश हेगडकर ,हे या कार्यक्रमास उपस्थित होते.  तसेच  पशुधन अधिकारी म्हणून निवड झालेले  डॉ. काकडे, डॉ. होरकाटे, रेडेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

 तसेच महेंद्र  रेडके यांची स्वच्छ्ता समितीच्या पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष पदी निवड झाल्याबददल तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचे आयोजन राहूल नाकाडे , गणेशभाऊ शिंगाडे,  तानाजी हेगडकर , अनिल ढावरे ,सुधीर पाडूळे, संपत पुणेकर व तेज पृथ्वी ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांनी केले .
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपेश वाघमोडे यांनी केले.
close