shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापूरी येथील मयुर रेडेकर यांची पशुधन अधिकारी तर शुभम रेडेकर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ट्रेनर ऑफिसर पदी निवड.

वडापूरी येथील मयुर  रेडेकर यांची पशुधन अधिकारी तर शुभम रेडेकर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ट्रेनर ऑफिसर पदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोक सेवाआयोग परीक्षेत  मयुर हरिदास रेडेकर यांनी यश संपादन केले असून त्यांची पशुधन अधिकारी निवड झाली. शुभम रेडेकर यांची नुकतीच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जागतिक लस निर्मिती कंपनीत ट्रेनर ऑफिसर म्हणून निवड झाली.

वडापुरी रामवाडी येथे दि.११ ऑक्टोबर रोजी दोघांचा सत्कार करण्यात आला.
 या सत्कार समारंभाला हरिदास माने उपाध्यक्ष श्रीनाथ पाणीपुरवठा, विजय खामगळ सर,सतीश कोरटकर, शरद सावंत तसेच वडापुरी व सुरवड परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 
यावेळी मयूर रेडेकर म्हणाले की, ग्रामीण भागातील व परिसरातील अनेक मुलांनी एमपीएससी परीक्षेत उतरून योग्य ती तयारी करावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल.

तसेच  यावेळी वडापुरी पंचक्रोशी मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये युवकांचा प्रतिसाद वाढू लागलेला दिसत असून त्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करून अजून काही प्रशासकीय अधिकारी वडापुरी मध्ये घडावेत अशी अपेक्षा आहे. युवकांनी अभ्यासामध्ये खूप प्रगती करून स्पर्धा परीक्षेद्वारे आपले यश संपादित करून गावाचे नाव लौकिक करावे असे मत श्रीनाथ पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष हरिदास माने यांनी  मत व्यक्त केले.



  प्रशासकीय सेवेत माझ्या कामाला न्याय देईन असे ते  अधिकाऱ्यांचा वडापुरी रामवाडी येथे नुकताच सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाला हरिदास माने उपाध्यक्ष श्रीनाथ पाणीपुरवठा, श्री.विजय खामगळ सर,सतीश कोरटकर शरद सावंत तसेच वडापुरी व सुरवड परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यापुढील काळात ग्रामीण भागातील व परिसरातील अनेक मुलांनी एमपीएससी परीक्षेत उतरून योग्य ती तयारी करावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे मयूर रेडेकर यांनी सांगितले.
close