shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या साईच्या नगरीचा चेहरा-मोहरा बदलणार नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर..!!


शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन)

शिर्डी : आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या साईच्या नगरीचा चेहरामोहरा धार्मिकते बरोबरच पर्यटनाभिमुख करण्यासाठी नगरपंचायतने शहरात विविध बगीचे विकसित करण्याबरोबरच रस्ते व चौकांच्या सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे़




शहरातील रस्ते, वीज, पाणी, गटार आदी मुलभुत प्रश्न मार्गी लागल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ़ सुजय विखे पाटील यांनी शहराचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेवून शहर सौदर्यीकरण व अन्य नागरी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यातुनच शहरातील महत्वाच्या जागा व रस्त्यांच्या चौकांच्या सुशोभिकरणाची कामे नगरपंचायतने हाती घेतली आहेत़

नगर-मनमाड मार्गाला जोडणाऱ्या कनकुरी रस्त्यालगत संत दासगणू महाराजांचे शिल्प बसवण्यात येणार आहे़ या ठिकाणी आकर्षक फुलझाडी, विद्युत रोषणाई, कला शिल्प, लॉन व भाविकांना सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे़ यासाठी साडेसतरा लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत़

नगर-मनमाड पासून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मुखावर भव्य बोइंग विमानाचे शिल्प उभारले जाणार आहे़ या ठिकाणीही आकर्षक फुलझाडी, विद्युत रोषणाई, लॉन व भाविकांसाठी सेल्फी पॉईंट असणार आहेत़ यासाठीही चोवीस लक्ष रूपये अपेक्षित आहेत़

या खेरीज ६९.११ लक्ष रुपये खर्च करून नाला रस्तावरील स्वराज हॉटेल चौक, झुलेलाल मंदिरालगतचा चौक, कनकुरी रोडवरील श्रीराम चौक, विमानतळ मार्गावरील फायर स्टेशनचा चौक, नगर-मनमाड मार्गालगत आरबीएल बँक चौक, रिंग रोडवरील सीटी मार्केट चौक व पिंपळवाडी रोडवरील दत्तनगरचा चौक सुशोभित करण्यात येत आहे़

जागेच्या उपलब्धतेनुसार शहरात अन्य ठिकाणीही सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत़ यासाठी उपनगराध्यक्ष, मा मुख्याधिकारी,सर्व नगरसेवक, नगरपंचायतचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले़

close