shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध साई भक्त मुनीमारप्पा यांनी बांधले बंगारपेठ येथे भव्यदिव्य साईबाबा मंदिर..!!


शिर्डी एक्सप्रेस न्युज नेटवर्क
कर्नाटक :- बंगारपेठ, कर्नाटक राज्य (जिथे पुर्वी सोन्याच्या मोठमोठ्या दोन-तीन किलोमीटर खोलीवर खाणी होत्या, आजही आहेत, पण शासनाने त्या बंद केल्या आहेत.) बंगारपेठ येथील प्रसिद्ध उद्योगपती व साईभक्त मुनीमारप्पा यांनी मोठा खर्च करून प्रतिसाईबाबा मंदिर बांधले आहे.या साईबाबा मंदिराचे प्रथम वर्धापन दिन साजरे करण्यात आले. हा कार्यक्रम पुजा पाठ मंत्रोच्चार करून विधीवत अगदीं भव्य दिव्य थाटामाटात संपन्न झाले.

या निमित्ताने शिर्डी एक्सप्रेसचे संपादक श्री रमेश जेठे(सर) व कार्यकारी संपादक व सामाजिक कार्यकर्ते श्री हरिषजी बंडीवडार यांना विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे भारतातील इतर राज्यातील अनेक साईभक्त व ओसीसीआय,नवी दिल्ली या राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

सविस्तर माहिती अशी की,बंगारपेठ येथील साईभक्त मुनीमारप्पा यांनी आपल्या आई वडीलांच्या स्मरणार्थ सुमारे दोन कोटी खर्च करून साईबाबांचे भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. हे साई मंदिर अतिशय आकर्षक व सुंदर भव्य दिव्य असे बांधले आहे. 

या मंदिरात सकाळ-संध्याकाळ दररोज गौमातेची पुजा-आरती करून साई आरती म्हटली जाते.हे मनोहारी दृश्य पाहून साईभक्त प्रसन्न होतात.याठिकाणी साईधूनी अहोरात्र चालू असते. साईभक्तांना येथील उदी आणि प्रसाद दिला जातो.  

मंदिराच्या शेजारीच मुनीमारप्पा यांनी आपल्याआई वडीलांचे मंदिर बांधले आहे.त्यांचीही पुजा- अर्चा दररोज सकाळ-संध्याकाळ केली जाते.मुनीमारप्पा हे निस्सीम साईभक्त व मातृपितृ भक्त असल्यामुळे त्यांना पंचक्रोशीत खुप मानसन्मान आहे. कारण या धावपळीच्या यंत्रयुगात असे क्वचितच पाहायला मिळते. 

मुनीमारप्पा यांच्या आई वडीलांची समाधी मंदिर


मुनीमारप्पा या साईभक्ताचे असे म्हणणे आहे की भविष्य काळात  शिर्डी येथील साईमंदिराच्या प्रमाणे साईभक्तांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्याप्रमाणे त्यांची वाटचाल चालू आहे.
कारण अनेक गोर-गरिब साईभक्त कर्नाटकातून आर्थिक अडचणीमुळे शिर्डीला कधीही येऊ शकत नाहीत,अशा साईभक्तांची सोय व्हावी ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेऊन त्य दिशेने काम करीत आहेत. 

मुनीमारप्पा यांनी साईमंदिर  बांधल्यानंतर प्रथम वर्धापन दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते,यावेळी साईबाबा मंदिर अतिशय सुंदरतेने सुशोभित करण्यात आले होते. तसेच महाप्रसादाचा आस्वाद सर्वांनी घेतला. 

   पदाधिकारी बैठक
         

  हरिष बंडीवडार व रमेेश जेेेेठेे(सर)
    

रमेश जेठे (सर) व पत्रकार नागराज
     

सदर कार्यक्रमातील स्वागत रंभात संपादक श्री रमेश जेठे (सर) अहमदनगर व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते हरिषजी बंडीवडार यांचे यथोचित सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे या कार्यमासठी ओसीसीआय कार्यकारिणीचे पदाधिकारी नरसिंह गुंजी, शिवरूद्रस्वामी, जयरामजी,श्रीरामालू, पत्रकार नागराज,पवनकुमार,लोकेशकुमार,वेंकटेश, हेमलता मॅडम,गीता मॅडम,जयलक्ष्मी मॅडम व ओसीसीआय चे 
अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
close