shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन गटात तुफान मारामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल..; गाडी पुढे माघे घेण्यावरून वाद..!



प्रतिनिधी ! मोहन शेगर :-
सोनई:-  घोडेगाव रोडवरील असलेल्या ठिकाणी गाडी माघे पुढे घेण्याच्या कारणावरून कोल्ड्रिंक्सच्या दुकानात असलेल्या फारूक पठाण यांच्यावर दुसऱ्या गटाकडून पोटात तीक्ष्ण हत्याराने जखमी करून प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी संदीप लांडे, सोमनाथ लांडे, संभाजी लांडे,अविनाश दरदले, विशाल वने,नामदेव कोरडे,संदीप कर्डीले,गणेश सोनवणे,शेहबाज शेख, ( सर्वांचे संपूर्ण नाव माहीत नाही)व इतर अनोळखी यांच्या विरुद्ध पठाणच्या जबाबवरून नासिर कासम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजी.न.३४१/२०२१ नुसार भा.द.वि.३०७,३२४,३२३,५०४,५०६,३२७,१४३,१४७,१४८,१४९,आर्म अक्ट ४,२५,सह क्रीमनल अमेडमेंट ७,महा.पोलीस अधिनियम ३७(१)(३)/ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दिवसा ढवळ्या झाल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे.
            

याबाबत पठाण यांचे मामा शहाबुद्दीन शेख यांना वरील लोक गाडी माघे पुढे घेण्यावरून मारहाण करीत असताना त्याचा भाचा फारूक हा मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्याला वरील मंडळींनी शिवीगाळ करून हातातील चॉपर,गज,लाकडी दांडे,यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून आमचे पोर बोलवून तुझा माज जिरवतो,असे म्हणून संदीप लांडे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पठाण याच्या पोटात वार करून,दहशत पसरल्या प्रकरणी नासीर पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पठाण यास जखमी अवस्थेत नगर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसरी फिर्याद सोमनाथ अशोक लांडे रा.लांडेवाडी यांनी दिली की,माझा चुलत भाऊ संभाजी लांडे यास गाडी माघे पुढे घेण्याच्या कारणावरून कलीम पठाण,फारूक पठाण,नासीर पठाण,इरफान शेख,गुड्डू पठाण,रा.सोनई,बाबा शिंदे रा.चांदा, व शहाबुद्दीन बालेसाहब शेख,व इतर ४ ते ५ जणांनी जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करून चापटी मारून,लाकडी दांड्याने,हातावर,मांडीवर,पाठीत लोखंडी गजाने जबर मारहाण करून संदीप कर्डीले, सोमनाथ लांडे,संभाजी लांडे,हे तिघे जण जखमी झाले आहे, आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली प्रकरणी सोमनाथ लांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजी. न.३४२/२०२१ कलम३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,सह,क्रिमिनल लॉ.अमेडमेंट ७,महा.पोलीस अधिनियम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे त्यांच्या जबाबवरून गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,शेवंगावचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी.रामचंद्र कर्पे अधिक तपास करत आहे.

        
गावात जनता सुरक्षित,शांततेत राहण्यासाठी पोलीस प्रशासन समन्वय साधून प्रयत्न करीत असून कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे.
        स.पो.नी.रामचंद्र कर्पे,सोनई पोलीस ठाणे.
close