shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थानला टि.व्ही.एस. कंपनीकडून १ मोटारसायकल, १ स्कूटर व १ सी. एन. जी मालवाहतूक अशा तीन नवीन गाड्या मिळाल्या देणगी स्वरूपात..!



 
शिर्डी । प्रतिनिधी :- श्री साईबाबा संस्थानला टि.व्ही.एस. कंपनीकडून १ मोटारसायकल, १ स्कूटर व १ सी. एन. जी मालवाहतूक अशा तीन नवीन गाड्या देणगी स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

टी. व्हि. एस मोटर्सकडून प्रत्येक नवीन मॉडेल बाजारात सादर करण्याअगोदर ते मॉडेल साईबाबांना देण्यात येते, असे कंपनीच्या इंन्टरनॅशनल बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट राहुल नायक यांनी सांगितले. आत्तापर्यंत १८ वेगवेगळ्या गाड्या कंपनीने साईबाबा संस्थानला देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत. 

ही वाहने साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संस्थानचे वाहन विभाग प्रमुख क्षिरसागर, कोकणे, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, साईव्दारकामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताराचंद कोते, विरेंद्र भंडारकर, कंपनीचे मोहंती, बाळासाहेब गाढे यांच्या उपस्थित सुपूर्त करण्यात आली.
close