shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अँड.राणीताई स्वामी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड..!!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 

दि.३,लातुर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कायदेशीर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अँड.राणीताई स्वामी यांची निवड झाल्याने महाराष्ट्रातुन अभिनंदन होत आहे. 



अँड.राणीताई स्वामी ह्या गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीत काम करीत आहेत.त्यांनी समितीत केलेल्या कामाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील(बाबा)खंडापुरकर यांनी अँड.राणीताई स्वामी यांची कायदेशीर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा पदी निवड केली.अँड.राणीताई स्वामी ह्या एल.एल.बी. कायद्याचे शिक्षण पास असुन त्यांचे एल.एल. एम.चे शिक्षण सुरु आहे त्या नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात.महाराष्ट्र भर त्या संघटनेचे कामकाज तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असतात.ही संघटना संपुर्ण भारतात विस्तारीत असुन ग्रामीण भागात दारुबंदीचा विषय असेल,महिला सक्षमीकरण,शेतकरी विषयी, ग्रामीण भागातील भ्रष्टाचार असेल या विषयी नेहमीच न्याय देण्याचे काम करीत आहे.अँड.राणीताई स्वामी यांच्या निवडीबद्दल मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश कुटे,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख,किसान विभाग जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख,तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे,संतोष पोले,हिंगोली जिल्हा महिला कोषाध्यक्ष आशाताई घोडके,सेनगाव महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई थिट्टे आदीकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

close