shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुक्यासाठी आ. चिमणराव पाटील यांनी लसच्या जास्तीच्या साठा उपलब्ध केल्यामुळे,उत्राण येथे नागरिकांनी घेतला महालसीकरणाचा लाभ...

 
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल : -तालुक्यातील उत्राण अहिर हद्द व गुजर हद्द येथे स्वयंस्फूर्तीने शांततेत नागरिकांनी मतदाना सारखी लाईनीत उभे राहून कोरोणा प्रतिबंधीत लस चे महाशिबिर तळई प्राथमिक आरोग्य केंद्र व उत्राण उपकेंद्र तसेच उत्राण येथील दोन्ही ग्रामपंचायत,पोलीस पाटील यांचे कडून घेण्यात आले.या मध्ये नागरिकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्हीही लसीकरण केंद्रावर तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी भेट दिली.
 गेल्या एक महिन्यापूर्वी एरंडोल तालुक्यास लसच्या पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात मिळत होता.त्यामुळे तालुक्यातील लसीकरणाची टक्केवारी ही खूपच कमी होती तालुक्यातील अनेक गावातील सरपंच,नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आमदार चिमणराव पाटील यांना सांगून तालुक्‍यासाठी लसीचा कोटा जास्त प्रमाणात मिळण्यात यावा असे सांगितले. आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश राऊत जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांच्याशी चर्चा करून  लसीचा कोठा जास्त प्रमाणात उपलब्ध करून घेतला. त्या अनुषंगाने एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने व एरंडोल तालुका आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने उत्राण  गुजर हद्द येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत व अहिर हद्द येथे उपकेंद्र येथे जम्बो लसीकरण शिबिर संपन्न.झाले.
उत्राण अ ह व गु ह दोन्ही मिळून 1475  नागरिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेतला.
तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोणा महामारी ची तिसरी लाट येण्याच्या आधी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
दोघेही लसीकरण केंद्रावर ग्रामपंचायत मार्फत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच गावात लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी दवंडी देण्यात आली होती.
 याप्रसंगी  पंचायत समितीचे मा.प्रभारी सभापती अनिल महाजन,आनंदा चौधरी भगत,अहिर हद्द सरपंच शारदा उपसरपंच मंगलाबाई कोळी, पाटील,गुजर हद्द सरपंच मनीषा वाघ, उपसरपंच योगेश महाजन ग्राम विकास अधिकारी प्रवीण अहिरे, माजी सभापती दिलीप रोकडे, दत्तू पाटील, भागवत पाटील, चंद्रकांत वाघ, हारुण देशमुख, हरीश पांडे, गुरुदास चौधरी, दिनेश सोनवणे, जितेंद्र महाले, अमोल महाजन पोलीस पाटील राजेंद्र महाजन, प्रदीप तिवारी, हेमंत पाटील, दीपक महाजन, विलास महाजन यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
लसीकरणासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ. अरविंद वानखेडे, आरोग्य सेवक प्रमोद गायकवाड, कैलास बडगुजर, मनोज कुलकर्णी, डाटा ऑपरेटर गजानन माळी, सायिका शेख, आरोग्यसेविका ज्योती न्याळदे, सुनिता चौधरी, सोनाली बागुल, माया खैरनार, सुवर्णा पाटील,एस एस मनवर यांचेसह आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.
फोटो-उत्राण ता एरंडोल येथे लसीकरण प्रसंगी आमदार चिमणराव पाटील, अनिल महाजन,आनंदा चौधरी भगत योगेश महाजन, चंद्रकांत वाघ व इतर पदाधिकारी
close