shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथे पद्मावती देवीची हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती

बावडा येथे पद्मावती देवीची हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती.
 येथील प्रसिद्ध पद्मावती देवीची  हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

इंदापूर:प्रतिनिधी(१३ ऑक्टोबर २०२१) 
           बावडा येथिल प्रसिध्द श्री कामाक्षी पद्मावती मंदिरात नवराञोत्सवानिमित्त देवीची आरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते बुधवारी (दि.१३) करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी परतीच्या समाधानकारक पावसाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने देवीचे ऋण व्यक्त केले. सध्या कोरोनाचे संकट कमी झालेले असले तरी ग्रामस्थांनी मास्क वापरणे व इतर नियमांचे पालन करावे, काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी गावातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या मंदिरामध्ये सप्तशती पाठ वाचन व इतर धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.


close