shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी महेंद्र रेडके व इंदापूर तालुकाअध्यक्षपदी राजकुमार जठार यांची निवड.

स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी महेंद्र रेडके व इंदापूर तालुकाअध्यक्षपदी राजकुमार जठार यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मौजे पडस्थळ येथील युवा नेते तथा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांची भारत सरकार राबवत असलेल्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी तर निमगाव केतकीचे इंदापूर तालुका अध्यक्षपदी राजकुमार जठार यांची निवड महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वच्छ भारत अभियानचे धनंजय दगडे पाटील  यांच्यावतीने करण्यात आली. महेंद्र रेडके व राजकुमार जठार  माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. 
या निवडी नंतर महेंद्र रेडके म्हणाले की ,देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.

पुढे म्हणाले की या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल. शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल हा या अभियानाचा उद्देश आहे.

तसेच स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. देश स्वच्छ करण्याचा संकल्प याच स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे.  हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मि पुणे जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान गावोगावी जाऊन राबविण व पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता आणखी व्यापक स्वरुप देण्याचे मि ठरविलेले आहे असे रेडके म्हणाले.
close