shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही' - खासदार सुप्रियाताई सुळे


जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. या विषयावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिलाे. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विराेधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही.

ज्यांच्यावर हे धाडसत्र सुरु आहे. ते केवळ दादांचे नातेवाईक नाहीत तर आमचे देखील नातेवाईक आहेत. आमचे एकत्र कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्रचा सह्याद्री दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि झुकणार ही नाही असे खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

दरम्यान आयकर भरले जात नाही का या प्रश्नावर सुळे म्हणाल्या जे धाडी टाकतात त्यांनाच विचारा. राजकीय सूड उगवला जात आहे का? महाराष्ट्रातील हे राजकारण अपेक्षीत आहे का? यावर ताई म्हणाल्या आम्ही असले राजकारण केले नाही. आम्ही अनेक वर्षे सत्तेत राहिलाे. सूडाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार ही नाही. (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही विराेधकांना कधी शत्रू मानले नाही आणि मानणार ही नाही ही आमची संस्कृती नाही असेही खासदार सुप्रिया सुळेंनी नमूद केले.
close