दिवाळी सणानिमित्त शिक्षकांचेवतीने मुले व पालकांना फराळ व कपडे वाटप..!
इंदापूर प्रतिनिधी: एक हात मदतीचा या सामाजिक व आपलेपणाचे भावनेतून मूळ इंदापूर तालुक्यातील रहिवासी असणारे व सध्या भोर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील कुंड व राजेवाडी गावात प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असणारे योगेश पांढरे , राजू भोंग व धनंजय टेंबरे यांनी शिरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांना व पालकांना दिवाळीपूर्वीच दिवाळी फराळ व कपडे वाटप (दि.२९ ऑक्टोबर) रोजी केले.
अतिशय दुर्गम भागात खडतर प्रसंगाना तोंड देत या भागातील लोक साधेपणाने सण साजरे करतात. यावेळी शाळेतील शिक्षकांनी एक हात मदतीचा दिल्याने मुले व पालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे पालकांना विशेष कौतुक केले व आभार मानले. यावेळी शिक्षकांनी मुले व पालकांना लाडू , चिवडा , करंजी , चकली असा फराळ व नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले.प्रसंगी राजीवाडी शाळेचे योगेश पांढरे , राजू भोंग व कुंड शाळेचे धनंजय टेंबरे , नवनाथ शेंडे , मुले , पालक उपस्थित होते.

