shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भिगवनच्या पै.पृथ्वीराज मंगेश खडके याने मिळवले ब्रांझ पदक .ब्राँझ पदक" मिळवल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव.

सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भिगवनच्या पै.पृथ्वीराज मंगेश खडके याने मिळवले ब्रांझ पदक .

ब्राँझ पदक" मिळवल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव. 
  इंदापूर प्रतिनिधी:  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संलग्न भारतीय कुस्ती संघ भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद यांच्या वतीने सातारा येथे मेगा फ्रुट पार्क प्रालि देगाव या ठिकाणी  २४ वे गीक्रो रोमन स्पर्धा दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर रोजी आयोजित झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भिगवनचे मंगेश खडके यांचे चिरंजीव पै. पृथ्वीराज मंगेश खडके याने सातारा येथे झालेल्या ९७ कीलो वजन गटा मध्ये "ब्राँझ पदक" मिळवून आई-वडिलांचे व आपल्या गावाचे नाव लौकिक करण्याचे काम पृथ्वीराज खडके याने केले आहे. 
पृथ्वीराज हा गेले दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य कुस्ती क्षेत्रात आहे. त्यांच्या वडिलांनी काबाडकष्ट करून खडके यांना आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच काकासाहेब पवार यांच्या आखाड्यामध्ये तो कसरत करत आहे. आज पर्यंत ७ मेडल पटकावले आहेत.  सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती ८.० ने दणदणीत विजय मिळवून पृथ्वीराज खडके याने "ब्राँझ मेडल" मिळवल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पैलवान पृथ्वीराज खडके यांच्या जडणघडणीमध्ये भिगवण येथील मोहन शेंडगे व महेश शेंडगे यांचे मोलाचे योगदान असल्याचे मंगेश खडके यांनी माहिती देताना सांगितले.
close