shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्री उत्साहानिमित्त वृक्षारोपण- शिवराज जगताप यांच्या शुभहस्ते..!!

शिर्डी प्रतिनिधी :

तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथे नवरात्र महोत्सव निमित्त ग्रीन फाउंडेशन च्या वतीने शिवराज अमित जगताप यांच्या शुभहस्ते वड या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले लहान वयात मुलांना वृक्षांची पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला संदेश जात आहे. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन हीच गरज लक्षात घेता लहान वयात वृक्षारोपणाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.


 ‘वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर उपाय’ दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले .

शिवराज अमित जगताप व ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

close