श्रीरामपूर । प्रतिनिधी :- येथील साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांना 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार ' मिळाल्याबद्दल बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांच्या संयोजनाखाली सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी साहित्य अकादमी सदस्या सुमतीताई लांडे,अड,शरद सोमाणी,उपजिल्हाधिकारी कविवर्य गणेश मरकड, कवयित्री सौ.माधुरी मरकड, कविवर्य यशवंत पुलाटे,प्रा.डॉ.विलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
'श्रीरामपूर भूषण पुरस्कार'हा डॉ. बाबुराव उपाध्ये यांना मिळालेला सन्मान प्रेरणादायी आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेतर्फे साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांना 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार' देण्यात आला. हा आम्हा सर्व साहित्यिकांना प्रेरणादायी असल्याचे मत बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांनी व्यक्त केले.
बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार साहित्य अकादमी, मुंबई अंतर्गत 'ग्रामोलोक' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री गणपतलाल मुथ्था उपस्थित होते.संस्थेचे सचिव ॲड. शरद सोमाणी,संचालक बापूसाहेब पुजारी, उदघाटक साहित्य अकादमी सदस्या सुमतीताई लांडे, कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे सांगलीचे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड,सौ. माधुरी मरकड, यशवंत पुलाटे,संगीता फासाटे हे उपस्थित होते.
या निमंत्रित कवींबरोबरच प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, डॉ. बाबुराव उपाध्ये,सूत्रसंचालक डॉ.अशोकराव माने यांनीही कविता सादर केल्या.प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी आपल्या स्वागत, परिचयातून डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्यसेवेचा विस्तृत परिचय देऊन श्रीरामपूर नगरपरिषदेने डॉ. उपाध्ये यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल कौतुक केले.साहित्यिकांनी साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे, डॉ. उपाध्ये यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्यसेवेत मोठे योगदान आहे, म्हणून आम्हाला त्यांचा सन्मान सर्वांच्या उपस्थितीत करताना आनंद वाटतो अशा भावना व्यक्त केल्या.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. उपाध्ये यांचे अभिनंदन व कौतुक केले.अनेक मान्यवरांची भाषणे झाली. डॉ. उपाध्ये आपल्या मनोगत म्हणाले, महाविद्यालयाने आपला केलेला हा सन्मान माझ्या साहित्यवाटेवर नेहमी प्रेरक ठरणारा आहे, प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांची गुणग्राहकता आणि साहित्य जिव्हाळा सदैव स्फुर्तीप्रद असल्याचा आनंद व्यक्त केला.डॉ. उपाध्ये यांना ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. ॲड,शरद सोमाणी यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. उपाध्ये यांचे कौतुक केले.प्रा. डॉ. अशोकराव माने यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.निजाम शेख यांनी समीक्षात्मक आभार मानले.

