ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी याकरिता राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मोठी चळवळ उभारणार - अजित पाटील.
. इंदापूर प्रतिनिधी: मराठा, ओबीसी ,धनगर आरक्षण हे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी याकरिता मोठी चळवळ उभारणार असल्याचे
सरडेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना
युवक आघाडीचे अजित पाटील यांनी प्रतिपादन केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यात इंदापूर येथील दत्तनगर, सातपुते वस्ती, नरुटवाडी, सरडेवाडी इत्यादी ठिकाणच्या शाखा उद्घाटन सोहळा शुक्रवारी(दि.२२ ऑक्टो) रोजी पार पडला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी माऊली सलगर व युवक आघाडीचे प्रभारी अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, तालुका अध्यक्ष सतीश तरंगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माऊली सलगर म्हणाले की,राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. कष्टकरी, शेतकरी, युवक, बेरोजगार ,कामगार हा पक्षाचा मूळ गाभा आहे. सर्वसामान्य माणसांना राजकीय सत्तेमध्ये भागीदारी देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झालेला आहे .या तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वेळेवर न देता शांत झोप कशी काय लागते हा एकच सवाल आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीवेळी इंदापूर तालुक्याने जानकर साहेबांवर मतदान रुपी भरपूर प्रेम केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसांच्या आडी अडचणी लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष काम करणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच युवक आघाडीचे अजित पाटील म्हणाले की, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये शाहू महाराजां सारखा प्रजेचे हित पाहून आरक्षण लागू करणारा त्यांचा कोणताही वारसदार तयार झाला नाही. त्यामुळे आतापर्यंत मराठा, ओबीसी ,धनगर आरक्षण हे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी याकरिता मोठी चळवळ उभारणार आहे.
यावेळी इंदापूर विधानसभा अध्यक्ष मनीष जाधव, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, तानाजी शिंगाडे, नवनाथ कोळेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला शिंदे, शहराध्यक्ष उमाताई मखरे, माणिकराव मारकड, सोनू जानकर ,नवनाथ कुलाळ ,परमेश्वर पुजारी, रंजीत सातपुते, पप्पू चोरमले, राजू जानकर, गणेश हेगडकर, समाधान काशीद, शहाजी भाळे, आप्पा माने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नवनाथ कोळेकर यांनी केले.

