shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विनायक बाजीराव कोते यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड..!!



शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमध्ये, शिर्डीचे विनायक बाजीराव कोते यांची पोलीस सहाय्यक आयुक्त (पोलीस उपाधीक्षक) क्लास १ पदावर निवड झाली आहे. सध्या ते मुख्याधिकारी, नगरपरिषद नवापूर, नंदुरबार येथे कार्यभार सांभाळत आहे, आणि यापूर्वी ते धुळे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांचे मोठे बंधू श्री माणिक कोते हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून वडील श्री बाजीराव कोते हे शेतकरी व आई सौ विमल कोते या गृहिणी आहेत. 


कुटुंबाच्या प्रेरणेतून त्यांनी हे यश संपादन केले आहे. ते शिर्डीच्या आदर्श शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आहेत. यावेळी बाबासाहेब घोरपडे, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा, अहमदनगर आणि कोते परिवारातील सर्व सदस्यांनी विनायक कोतेंचा सत्कार करत पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.
close