अनिशा सय्यद यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्षपदी वडापूरी येथील अनिशा सय्यद यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांच्या हस्ते वार्षिक आढावा बैठक मध्ये संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे (दि.१ नोव्हेंबर २०२१) रोजी करण्यात आली .
अनिशा सय्यद यांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, संस्कृती ,क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाची दखल घेत त्यांच्या व्यक्तिमत्व व ख्याती प्रमाणे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक करण्यासाठी आणि आपल्याबरोबर सदैव सामाजिक कार्यामध्ये सक्रीय सहभाग राहो यासाठी त्यांची निवड करून नियुक्ती पत्र महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी दिले आहे.
अनिशा सय्यद ह्या वडापुरी गावात आशा स्वयंसेविका या पदावर ती कार्यरत असून त्या त्यांच्या परीने या पद भरातून आपले सामाजिक बांधिलकी जपण्याचा या फ्रंटच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याने त्या इंदापूर तालुक्यातील महिलांचे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

