प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे सरदार वल्लभ भाई पटेल जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चौकात सिमेंटच्या बाकाचे उद्घाटन व अनाथ आश्रमातील 21 विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते पूजन करून त्यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी दिलेल्या सिमेंट बाक यांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. तसेच निबंध व वकृत्व स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली निबंध स्पर्धेमध्ये एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये प्रथम रोहित कैलास बेलदार, दृतीय कु. भाग्यश्री संतोष पाटील,तृतीय समर्थ अण्णागीर गोसावी,उत्तेजनार्थ यशवंत कैलास झाल्टे तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अ गटात प्रथम प्राजक्ता गोरख महाजन,दृतीय यश गौतम सोनवणे, तृतीय कृष्णा अनंत बडगुजर, ब गटात प्रथम रोहित वासुदेव महाजन, दृतीय राज गौतम सोनवणे, तृतीय अनुष मंगेश पाटील, उत्तेजनार्थ सार्थक प्रदीप पाटील
निबंध वकृत्व सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल तसेच सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल शामू पाटील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, निराधार समितीचे माजी अध्यक्ष सुनील पाटील,जेष्ट पत्रकार शिवाजीराव अहिरराव, सुनील चौधरी, प्रशांत महाजन, निबंध स्पर्धेचे निरीक्षक म्हणून जी आर महाजन तर वकृत्व स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रकाश महाजन व एस आर पाटील यांनी स्पर्धेचे विजेते घोषित केले. तसेच माऊली क्लासेस चे संचालक गोरखनाथ महाजन सर यांनी विद्यार्थ्यां कडून स्पर्धेची तयारी करून घेत मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांच्या क्लासेस तर्फे दिले व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला. यवेळी नगरसेवक मा नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व सर्व गुर्जर समाज बांधव मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सर्वोदय प्रतिष्ठानच्यां कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले सुयोग पाटील,यश पाटील,ओम पाटील, प्रथमेश पाटील,आकाश पाटील,विलास पाटील,ओम पाटील,वैभव महाजन
सूत्रसंचालन चेतन पाटील यांनी केले व आभार पंकज पाटील यांनी मानले.

