शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०८ नोव्हेंबर , २०२१
प्रतिनीधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
सदर धमकी गुरुवारी ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. इतकेच नव्हे तर या ट्विटर अकाउंटवरून अनेक आक्षेपार्ह ट्विटही करण्यात आले आहेत.
गुरुवारी ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीने दीपक शर्मा नावाचे खाते तयार केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर या ट्विटर अकाउंटवरून अनेक आक्षेपार्ह ट्विटही करण्यात आले आहेत.
या सर्व ट्विटची दखल घेत यूपी 112 च्या अधिकाऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.
क्राइम ब्रँचचे अनेक पथक तपासात गुंतले असून काही सुगावाही लागल्याचे सांगण्यात येत आहे. जेसीपी क्राइम नीलाब्जा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे ट्विट पाठवणाऱ्या ट्विटर हँडलसंदर्भात माहिती एकत्रित केली जात आहे.
या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. जेसीपींच्या मते धमकी देणाऱ्याला लवकरच अटक करण्यात येईल.
यापूर्वीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधात सोशल मीडियावरून अनेक वेळा धमक्या आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींना जेलमध्येही पाठवले आहे.
आता हे प्रकरणही पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. क्राइम ब्रांचची अनेक पथकं याचा तपास करत आहेत.
गुरुवारी ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीने दीपक शर्मा नावाचे खाते तयार केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

