shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द येथील चिमुकल्या पाऊलांचे गावकऱ्यांनी केले अनोख्या पध्दतीने स्वागत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१

राहुरी : कोरोना महामारीच्या प्रदिर्घ दोन वर्षाची विश्रांती तसेच दिपावलीच्या अल्पकालीन सुट्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवारपासून पुन्हा पुर्ववत सुरू झाल्याने बऱ्याच दिवसापासून कोमजून गेलेल्या शाळा चिमुकल्यांच्या गलबलाटाने अक्षरशः फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिन्यांपासून शालेय शिक्षण विभागावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे,तसेच शासनाकडून नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत असल्याने शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहेत. 
        अहमदनगर जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण 6 हजार 327 शाळा असून, त्यात 8 लाख 91 हजार 505 विद्यार्थी संख्या आहे. कोरोना प्रभाव कमी झाल्याने आता जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे गट शिक्षणाधिकारी स्वपनील सूर्यवंशी यांनी सांगितले.
         याच धर्तीवर  आज गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या आदेशानुसार "खडांबे खुर्द" येथील  इयत्ता पहिली ते चौथी   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरोना सारख्या परिस्थिती  हळु-हळू सुधारणा झाल्याने तब्बल दीड वर्षांनी शाळा सुरु होणार म्हणून मुले, पालक व शिक्षक सर्व आनंदी होते . यावेळी खडांबे खुर्द येथील  मुलांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्प गुच्छ देऊन शाळेच्या प्रवेशव्दारावरच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
           याप्रसंगी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री . प्रभाकर हरिश्चंद्रे ,  किशोर हरिश्चंद्रे , गणेश पारे, अमोल हरिश्चंद्रे, लक्ष्मण हरिश्चंद्रे , मनोज कारले , श्रीमती मनिषा  विप्रदास मॅडम , श्रीमती मनिषा  कोष्टी मॅडम , श्रीमती मंदा फलके मॅडम , श्रीमती  उषा ठुबे, श्रीमती उर्मिला दुबे ,श्री. मारुती कुलट सर व श्री रावसाहेब जाधव सर आदि. उपस्थित होते .
         अहमदनगर जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण 6 हजार 327 शाळा असून, त्यात 8 लाख 91 हजार 505 विद्यार्थी संख्या आहे. कोरोना प्रभाव कमी झाल्याने आता जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
               त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची घंटा आता वाजणार यात शंका नाही पाचवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू झाले होते. परंतु पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांनंतर भरणार आहेत. कोरोना स्थितीमुळे पहिल्या व दुसर्‍या लाटेत गेल्या दीड-पावणेदोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद होती.


"शाळा सुरू करत असतानच आम्हीं कोरोना सुसंगत नियमावलींचे विद्यार्थ्याना काटेकोर पालन करायला लावत आहे आम्हीं सर्व विद्यार्थ्याना मुखपट्टी बांधकारण आहे आणि ती घातली की नाही हे वारंवार बघत असतो, दोन विदयार्थीमध्ये सामाजिक अंतर,सॅनिटाझर वेळोवेळी लावणे, आणि पाण्याची मोठी टाकी आहे तिथे साबनांची देखिल व्यवस्था केली, वेळोवेळी हात धुवायला लावत आहोत  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ५० टक्के उपस्थिती ठेउन आसन व्यावस्थेमध्ये एका बँच वर एक विदयार्थी. अशा रितीने शाळा सुरू केली आहे. 
     : एकुणच चिमुकल्यांच्या सुरक्षितता व गुणवत्तेसाठी शाळेचा प्रत्येक घटक मनापासून कार्यरत असल्याचे पाहता सर्वच शाळेतून असे प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळा उच्चतम गुणवत्ता प्राप्त होतील यात तिळमात्रही शंका नाही..!!'
"रावसाहेब जाधव-शिक्षक  जि.प.प्रा. शाळा खडांबे खुर्द"
"शाळा सुरू झाल्याचे कळताच जि.प.प्रा. शाळा खडांबे खुर्द येथिल माजी विदयार्थी मुंबई येथे स्थाईक आदर्श शिक्षक श्री. जनार्दन साळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शालेयउपयोगी साहित्य आणि आकर्षक गणित किट आणि दहा हजार रूपये वस्तुरुपी भेट दिले. तसेच यापूर्वीही त्यांनी शाळेच्या सुशोभीकरणकरण आणि रंगकाम याकरीता रुपये दहा हजारांची देणगी रोख स्वरूपात दिली होती. यावेळी प्रभाकर हरिश्चंद्रे जगदिश हरिश्चंद्रे मयूर हरिश्चंद्रे सचिन हरिश्चंद्रे मारूती कुलट रावसाहेब जाधव मनिषा विप्रदास मनिषा कोष्टी मंदा कुलट आदि. उपस्थित होते.
श्री. प्रभाकर हरिश्चंद्रे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खडांबे खुर्द."

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close