shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाचा कच्चा आराखडा(09-OBC,06-SC,01-ST)निवडणूक आयोगाला सादर होणार- मुख्याधिकारी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१  
 
- श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाचा कच्चा आराखडा(09-OBC,06-SC,01-ST)निवडणूक आयोगाला सादर होणार- मुख्याधिकारी…
श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाचा कच्चा आराखडा(09-OBC,06-SC,01-ST)निवडणूक आयोगाला सादर होणार- मुख्याधिकारी…

श्रीरामपूर : लवकरच श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली असल्याने नगरपालिकेची कच्ची प्रभाग रचना तयार झाली आहे.तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे ही रचना पाठवल्यावर तिला अंतिम स्वरूप येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री.गणेश शिंदे यांनी सांगितले.
 
       श्रीरामपूर नगरपालिकेत एकूण 34 प्रभाग आहेत. त्यापैकी 17 जागा महिलांसाठी राखीव असून या कच्च्या आराखड्यानुसार ओबीसी साठी नऊ,एससी साठी सहा व एसटी करिता एक जागा राखीव असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

        या कच्चा आराखड्यामुळे इच्छुकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरले असून काही इच्छुकांमध्ये आपला प्रभाग राखीव होण्याची देखील भिती पसरली आहे.अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतरच इच्छुकांच्या हालचाली वेग येईल असे दिसते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close