shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळा कॉलेजजवळ स्विफ्ट डिझायर मोटरसायकलला धडकल्याने खोकरचे तीन तरुण गंभीर जखमी;अद्यापपर्यंत गुन्हा दाखल नाही..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१  

 वडाळा कॉलेजजवळ स्विफ्ट डिझायरने मोटरसायकलला ठोकल्याने खोकरचे तीन तरुण गंभीर जखमी;अद्यापपर्यंत गुन्हा दाखल नाही…


श्रीरामपूर : श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने ओवरटेक करण्याच्या नादात श्रीरामपुरकडून भोकरफाटाकडे जाणाऱ्या सिटी हंड्रेडला जोरदार धडक दिली.या अपघातात सिटी हंड्रेडवरील रवी पटारे,राहुल चक्रनारायण, जनार्दन डोळस हे खोकर येथील रहिवासी असलेले तरुण गंभीर जखमी झाले आहेत.यातील दोघांना नगरला हलवण्यात आले आहे.
       याबाबतची अधिक माहिती अशी की,ही स्विफ्ट डिझायर गाडी श्रीरामपूर शहरातील एका हॉटेल मालकाची असल्याचे समजते.तसेच या प्रकरणी जखमींचे नातेवाईक व खोकर येथील काही ग्रामस्थ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता संबंधित एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांना जखमींचा जबाब झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. 
 
        तरी अद्यापपर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या गंभीर अपघाताच्या घटनेबाबत गुन्ह्याची नोंद झालेली नसल्यामुळे खोकर ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close