shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक बांधिलकी जपा; उस तोडणी मजुरांना मदत करा.-डिवायएसपी संदिप मिटके..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि थंडीने हाहाकार उडवला आहे. सध्या सर्वच ठिकाणी ऊस तोडणीचे काम सुरू आहे परंतु अशातच राहते घर-निवारा सोडून ऊस तोडणीसाठी आलेले ऊस तोडणी मजुरांची अवकाळी पावसामुळे अतोनात हाल होत आहे. काल झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसल्याचे चित्र आहे.
 
         अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत,गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी यांना पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आवाहन केले आहे की अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्या कारणाने आपले गावातील ऊस तोडणी मजुरी करता आलेले मजुरांची अतोनात हाल होत असून त्यांना गावातील मंदिरे शाळा समाज मंदिर धर्मशाळा आधी ठिकाणी निवारा व स्वयंपाक करिता जागा उपलब्ध करून द्यावी दळण, सरपण, धान्य आदी जीवनावश्यक गोष्टींची अत्यंत गरज आहे आपण या ऊस तोडणी मजुरांच्या पाठीमागे उभे राहून आपली सामाजिक बांधिलकी आपण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व तुमच्या कडून शक्य होईल ती मदत त्यांना करावी असे कळकळीचे आवाहन समाज माध्यमाद्वारे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

                                                                                             
close