shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरत-हैदराबाद महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महसूलमंत्री यांनी लक्ष घालून न्याय द्यावा : डॉ. कृषिराज टकले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१

राहुरी : "सुरत-हैदराबाद" ग्रीनफिल्ड हा राष्ट्रीय महामार्ग राहुरी तालुक्यातील १९ गावांमधून जात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन या महामार्गावर करिता संपादित होणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी हे भूमिहीन होऊन रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आज येणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा योग्य मोबदला शासनाने दिला जावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे या मागणीकरिता प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
            या उपोषणात नुकताच स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषिराज टकले व प्रदेशाध्यक्ष सुभाष नागरे यांनी पाठिंबा दिला असून याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषी राज टकले म्हणाले की सुरत- हैदराबाद या ग्रीनफिल्ड करिता जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने कवडीमोल भावात न घेता योग्य मोबदला शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाहिजे शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये सामाविष्ट करुन शेतकरी कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले पाहिजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची वेळ आलेली आहे हा मार्ग निर्माण करून शेतकरी विस्थापित होणार आहेत त्यामुळे महसूल मंत्र्यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघ मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे अशी माहिती मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषी टकले यांनी दिली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close