शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१
देवळाली प्रवरा : आज गांवगाडा लिहताना देवळाली प्रवरा येथील माजी सनदी अधिकारी लिहतात की, आपणांस सांगितल्याप्रमाणे आम्ही आज संपर्क अभियान सुरु केले.हेल्प टीम सदस्य शहरवासीयांशी हितगुज सुरु केले. लोकं मनमोकळे बोलत आहे, त्यांचा व्यवसाय , प्रपंच , मुलांचे शिक्षण,नोकरी लग्न.शेतीतील अडचणी. प्रश्न समजु लागले आहेत. त्यावरची उत्तरे शोधायचा प्रयत्न करणार आहोत.मी गांवगाड्यात सांगितल्याप्रमाणे रस्ता न् बांधावरची भांडणे समोर आली, गांवगुंडी दुसरे काय.त्यांना काही मंत्र तंत्र सांगितले.त्यात एकजण गमतीने म्हणाला तुमची टीम आली , रिपोर्ट पोहचला कि आमची कामे मार्गी लागतील. म्हटलं चांगलेच आहे. लोकांचे प्रश्न सुटत आहेत.त्यास आम्ही निमित्त ठरत आहोत.खुप वेगळा अनुभव मिळत आहे. चर्चा न् संवाद खुपच भन्नाट. हेल्फटीम घराघरात पोहचली हे नसे थोडके.
आम्ही चालवलेली कधीकाळची दुधडेअरी.सुरु केलेली वारी. जो आला त्याला केलेली मदत लोकं बोलुन दाखवत आहेत. गेल्या ३०-४० वर्षात आपण नकळत किती लोकांचे कामी आलो याची प्रचिती येत आहे.लोकंहि ते ध्यानात ठेवुन आभार मानत आहेत.खुप बरे वाटले.माझे हेच म्हणणे आहे आम्ही हेल्फ टीमने तुम्हांला काय दिली. आम्ही काय दिले याचा मनात ताळेबंद मांडा. आम्ही जी परखड भुमीका घेत आहोत. ती आमच्या करिता मुळीच नाही ती आहे तुमच्या करिता. आमची फकिराची झोळी त्यात तुम्ही फुले टाकली काय न दगड टाकले काय आम्हांला वाईट वाटत नाही. परंतु तुमच्या पदरात नक्कीच काहीना काही आम्ही टाकले , टाकत आहोत न् टाकत राहु.नगरपरिषद निवडणुक हे आमचे एकमेव उद्गीष्ट्य नाही तर हि हेल्पटीमची ओपीडी अहोरात्र चालु रहावी. कोणता असा प्रश्न नाही त्याचे आमचेकडे उत्तर नाही. तोहि प्रामाणीक प्रयत्न करत.
एका न्युज पोर्टलने आवाज मांडला जनतेचा. त्यात गेल्या निवडणुकीत कुणी कुणाकडे माणसे पाठवली. आता ती नाराज आहेत , मामा, दादा भाऊ कोण असतील ते पुन्हा सासरं सोडुन घटस्फोट घेत माहेरी ओझे बनत आहेत. या साटेलोट्याने आमचा पराभव झाला. कारण साटेलोटे करणा-यांचे नेते शिवसेना पक्षात होते. त्यांनी काम नका करु देवु शांत राहिले असतेतरि आमचे चार नगरसेवक नक्की असते. जरतरला राजकारणांत अर्थ नसतो. हे डावपेच असतात. युध्दात ते वापरले जातात.परंतु शेवटी नितीमत्ता नावांचा एक भाग असतो.त्या कसोटीवर आयाराम गयाराम प्रकारचं मुळात अनैतीक व्यवहार आहे. ६ जणांना उमेदवारी देत भाजपाने त्यांचे निष्ठावंताना डावलले.आजतागायत सोबत रहात मिठाईचा आस्वाद घेतला. आता ऐनवेळी पक्षांतर करत तेथील निष्ठावंतावर अन्याय होणार. मुळात हे साटेलोटे असल्याने हा अन्याय न् पक्षांतर ठरवुन केलेली बाब आहे.
आता कोण कुणाला मामा बनवणार यापेक्षा यंदा गावचे मतदार यांना मामा बनवणार आहेत. जर सत्तारुढ चुकीचे काम करत असतील. विकास केला नसेल तर मग हे आयाराम गयाराम देखील त्याच सत्तारुढ गटात होते. तेहि तेवढेच जबाबदार. ते तिकडुन इकडे आले म्हणजे पावन झाले असे नक्कीच नाही. त्यांना पुर्वीच्या पक्षांतराचे न् आत्ताचे घरवापसीचे कारण विचारा. आपला हा मौलिक अधिकार मतदानाचे आधल्या रातीच्या प्रसादावारी तारण ठेवु नका. तुमची सहनशक्ती न् अबोला यांना अभय देत असतो. आता बोला जाब विचारा. उगाच हा इकडे गेला तिकडे गेला. ह्याची चर्चा चघळत बसण्यापेक्षा प्रश्न विचारा. तुमच्याकडे नसतील तर आम्ही देवु तुम्हांला प्रश्न. पण विचारण्याचे धाडस करा. आमची जीम छान चालली आहे. आमची ओपेडीहि. आज सकाळचे चित्र पाठवत आहे. पहा. केल्याने होते आहे आधी केलेच पाहिजे. मग ठरवा मामा बनायचे कि मामा बनवायचे ,शुभसंध्या #गांवगाडा
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

