शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
राहुरी तालुक्यात संत गाडगेबाबा पुण्यतिथी व डॉ.बाबुराव दादा तनपुरे यांची 108 वी जयंती उत्साहात साजरी..!!
राहुरी : तालुक्यात विविध संस्थांमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी व सहकार महर्षी डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांची 108 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक सुर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, शहाजी जाधव, विलास तनपुरे, नंदकुमार तनपुरे, गजानन सातभाई, अशोक आहेर, माजी नगरसेवक सदाशिव सरोदे, काकासाहेब खंडागळे, सुनील कुमावत, सुधीर वैद्य, गणेश फुगारे व कर्मचारी उपस्थित.
प्रसाद शुगर येथील कारखाना कार्यस्थळावर डॉ बाबुराव दादा तनपुरे ह्यांची जयंती अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे कार्यालयात डॉ. बाबुराव दादा तनपुरे ह्यांची जयंती साजरी करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या 108 वी जयंती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपसभापती जालिंदर आढाव, संचालक रमेश पवार, बापूसाहेब गागरे, दत्तात्रय खुळेे, ताराचंद तनपुरे, गणेश खेवरेे, विजय डौले, अशोक आहेर व सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, हमाल व सचिव प्रकाश डुक्रे उपस्थित होते.
राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. येथे डॉ दादासाहेब तनपुरे यांची जयंती संस्थेचे संचालक रावसाहेब शंकर तनपुरे यांचे हस्ते संपन्न झाली. सदर कार्यक्रमात संस्थेचे संचालक सुधाकर बाबुराव तनपूरे, शिंदे पाटील, लक्ष्मण म्हसे, गोकुळदास आढाव, देशमुख भाऊसाहेब, कांतिराम वराळे, मॅनेजर रमेश फुलसौंदर, स्वप्नील कडू, युसुफ आतार, शिवाजी गोंधळे, सागर कडू आदी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात तालुक्याचे शिल्पकार डॉ बाबुराव दादा तनपुरे ह्यांची 108 वी जयंती व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गट नेते रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर म्हसे, बाळासाहेब पेरणे, भारत भुजाडी, गट विकास अधिकारी गोविंद खामकर, सुनील सूर्यवंशी, भाऊसाहेब राहिंज आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेत डाॅ. बाबुराव दादा तनपुरे यांची जयंतीनिमित्त व संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे पत्रकार संजय कुलकर्णी, सौ.स्मिता जोशी व सुनील आहेर यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यानिमित्त कु.प्राजक्ता शेळके, कु.साक्षी कापसे, कु.सोनू चव्हाण या विद्यार्थिनींची भाषणे झाली. श्री.पातोरे यांनी व प्राचार्या सौ.शेडगे यु.बी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार संजय कुलकर्णी व सुनील आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. होतकरू विद्यार्थिनींना वह्या वाटप केल्या. सूत्रसंचालन मधुकर म्हसे यांनी केलेे तर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. निवडुंगे, शिंदे, संतोष निकम, बाबासाहेब कटारे, हौशिनाथ बोर्डे, सर्जेराव तनपुरे यांनी स्टेज व्यवस्था व मोढे, सय्यद यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी प्रसाद गायकवाड, मच्छिंद्र आघाव, चंद्रकांत आघाव, तनपुरे, पर्यवेक्षक गावडे मॅडम व सर्व स्टाफ शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते. विद्यार्थिनीनी रांगोळ्या काढल्या. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांचे मार्गदर्शनानुसार कार्यक्रम घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

