shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा आधिकार्यांकडुन चोरीचा शोध..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१ 

राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा आधिकार्यांकडुन चोरीचा शोध..!!

राहुरी (कृषी विद्यापीठ) : राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाच्या शेतातून पाच हजार रूपये किंमतीचा दोन टन ऊस चोरून नेल्याची घटना १९ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान घडली आहे. याबाबत संपत गागरे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे तंत्रज्ञान योजना विभागातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक युवराज रामदास पवार यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजल्या पासून ते २० डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान बियाणे विभाग विद्यापीठ यांच्या शेतातून पाच हजार रूपये किंमतीचा दोन टन ऊस आरोपीने स्वतःच्या फायद्याकरीता कोणाचीही परवानगी न घेता चोरून नेलाय. घडलेला प्रकार लक्षात आल्या नंतर युवराज पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात हजर होऊन फिर्याद नोंदविली.

 

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संपत सोपान गागरे राहणार डिग्रस ता. राहुरी याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष राठोड हे करीत आहेत.

 

राहुरी कृषी विद्यापीठ सुरक्षा गेल्या वर्षभरात नियमित सुरक्षा अधिकारी नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याचा कोणाला तपास लागत नव्हता. त्यामुळे चोरीचे गुन्हे दाखल होत नव्हते. सदर गोष्ट विद्यापीठ प्रशासनाचे लक्षात आल्यामुळे त्यांनी गोरक्षनाथ शेटे यांना नियमित सुरक्षा अधिकारी पदाचा कार्यभार सोपवला. त्यामुळे त्यांनी कार्यभार घेताच आपली कर्तबगारी सिद्ध करीत ऊस चोरीची खबर मिळताच सुरक्षा रक्षकांना सह उसाच्या शेतामध्ये 19 डिसेंबर 2021 चे मध्यरात्री नंतर बियाणे विभागाच्या बियाणी तंत्रज्ञान योजना यांचे शेतातील उसामध्ये चोराच्या मागावर बसले असता पहाटे पाचच्या सुमारास शेजारील शेतकरी संपत सोपान गागरे हा ऊस चोरीसाठी आला असता सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे सुरक्षा पर्यवेक्षक संदीप ढसाळ, बाळासाहेब हाळनोर,मयूर हरिश्चंद्रे व सतीश वाघ यांनी ऊस चोरणाऱ्या चोरास रंगेहात पकडले. यापूर्वी सदर ऊस शेतातून सुमारे दोन टन ऊसाची अंदाजे किंमत पाच हजार रुपये मुद्दे मालाची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदरील प्रक्षेत्रातील अधिकारी युवराज पवार यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 379 नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष राठोड हे करीत आहे.


गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षा अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्याने चोरांना जरब बसली असुन चोरांच्या प्रमाणात घट झाली आहे. चोरांना चोरीच्या गुन्ह्यात पकडून गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यापीठ अधिकारी कुलगुरू, कुलसचिव, संशोधन संचालक माने, नियंत्रक प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे यांनी सुरक्षा अधिकारी यांच्या कामाचे कौतुक केले आहे व सुरक्षा विभागाचे कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close