shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन.

इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन.
इंदापूर प्रतिनिधी:दि १८ रोजी निमगाव-केतकी येथे ओबीसी संघर्ष कृती समिती इंदापूर तालुका यांच्या वतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबीत मागण्या मान्य व्हाव्यात व शासन दरबारी विविध मागण्या पोहचवण्यासाठी व्याहळी चौक येथे सर्व प्रमुख पक्षातील पदाधिकारी व ओबीसी समाजातील शेकडो सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  येथे रस्ता रोको केला व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
 
सरकारने जातिनिहाय जनगणना करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजास पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळावे,स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षणाप्रमाणे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषदेत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळावे,शासकीय सेवेत ओबीसी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नती मिळावी,महात्मा फुले ओबीसी महामंडळाचे आर्थिक बजेटमध्ये  भरघोस वाढ करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेतीमालास रास्त भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात,विद्यार्थ्यांच्या  उच्च शिक्षणासाठी सारथीच्या धर्तीवर ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था निर्माण करावी, अशा विविध मागण्या संदर्भातील निवेदन मा राज्यपाल , मुख्यमंञी , विरोधी पक्षनेते यांनी तहसिलदार इंदापूर व पोलिस निरिक्षक इंदापूर यांचेमार्फत देण्यात आले.
याप्रसंगी मच्छिंद्र चांदणे , माणिक भोंग , राहुल जाधव , देवराज जाधव , ॲड कृष्णाजी यादव यांनी भाषणातून औबीसी समाजाच्या मागण्या मांडल्या.
 यावेळी वसंत मोहोळकर ,  दशरथ डोंगरे , मोहन दुधाळ, माऊली बनकर , पोपट शिंदे , संजय शिंदे , ॲड सचिन राऊत , दत्ताञय शेंडे , तात्यासाहेब वडापुरे , गोरख आदलिंग , ॲड सुभाष भोंग , तुषार खराडे , राजू भोंग , निमगाव केतकी परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुञसंचालन संतोष राजगुरू यांनी केले.
close