राज्य शासनाने सण २०१७ - १८ ला घोडेगांव साठी तब्बल ८ कोटी १३ लाख रुपयांचा नीधी मंजूर केला . चार वर्षात भव्य दुमजली इमारती चे बांधकाम पुर्ण झाले. घोडेगांव येथिल आद्यावत सर्व सोयीनुक्त बांधण्यात आलेले हे तालुक्यातील दुसरे रुग्णालय सर्व सामान्याचा आरोग्यासाठी उपलब्ध होणार आसुन येथे आॕपरेशन थिएटर ,महिला पुरषांसाठी व लहान मुलांसाठी स्वतंत्र ओपीठी विभाग, मेडिकल स्टोअर, बाह्य रुग्ण ,अंतररुग्ण कक्ष, माता संगोपण ,प्रयोगशाळा प्रसुतीगृह,क्षकिरण विभाग ,कुटुंब कल्यान नेत्र तपासणी शवच्छेदन विभाग तसेच केन्द्र व राज्य शासनाच्या विविध योजना गोर गरीब रुग्णांना सुविधा मिळणार आहे. डाॕक्टर नर्स आदी मोठा स्टाफ येथे उपलब्ध केले जाणार आहे. तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी नगर येथे जावे लागत आसताना नगर -संभाजीनगर महामार्गावर मध्यवर्ती आसलेले येथे शासकीय ग्रामीण सुरू होत आसल्याने परीसरातील गरजु नागरीकांची ससेहोलपट थांबून चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे.
९ कोटी खर्च .
ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी आठ कोटी तेरा लाखांचा खर्च झाला आसुन चार हजार चोरस फुटात दुमजली बांधकाम पुर्ण झाले. संरक्षक भिंत व डाॕक्टर नर्स राहाण्यासाठी व्कर्टर बांधकाम रहिले आसुन या रुग्णालयासाठी नऊ कोटी निधी खर्चाचा वापर झाला आहे.
इमारत हस्तांतरण पत्र सादर ..!
ग्रामीण रुग्णालय चे बांधकाम पुर्ण झाल्याचे हस्तांतरण चे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने घोडेगांव रुग्णालय मेडिकल आॕफीसर यांना दिले व सरंक्षक भिंत वइतर कामासाठी सिव्हिल रुग्णालय नगर यांना आवश्यक कागदपत्रे दिली आहे .--------- बोदरडे रावसाहेब साहयक आभियंता सा.बा. नेवासा.

