shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळीचे पै. भारत जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.

व्याहाळीचे पै. भारत जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.
पै. भारत जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील व्याहाळी गावचे सुपुत्र आजोबा-पणजोबा पासून ज्या घरात पैलवान की चालते असे पै. भारत गोटेराम जाधव यांना पंढरपूर तालुक्यातील पेहे या गावात आदित्य ठाकरे केसरी मैदानाचे आयोजन समस्त ग्रामस्थ पेहे यांच्या वतीने श्री यल्लमा देवी यात्रेनिमित्त   दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी केले होते. या ठिकाणी अनेक  पैलवानांच्या उपस्थितीत  शिवछावा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुजित करळे, उपाध्यक्ष हरीभाऊ जाधव या मान्यवरांच्या व  सादिक पठाण पोलीस मित्र सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, सद्दाम पठाण शिवछावा मावळा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष, वडापुरी चे धनाजी जाधव, शिवछावा मावळा संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष संदीप कंपने, मोहम्मद पठाण, प्रकाश बंडगर, महेश शिंदे, हनुमंत नायकुडे, नारायण मोहिते, वसंत साळुंखे, परशुराम नायकुडे पंचकमिटी तील सर्वांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 शिवछावा मावळा महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने चांदीची गदा बक्षीस म्हणून या कार्यक्रमास भेट देण्यात आली.


भारत जाधव यांचे अजोबा नारायण जाधव, वडील गोटेराम जाधव हे पैलवान होते. भारत जाधव  यांचा थोरला मुलगा पै. संतोष जाधव हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेते आहे तसेच त्यांना तीन रौप्य एक कास्य महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा कुस्ती/जुडो मध्ये सहा गोल्ड, सहा रोप्य ,आठ ब्राऊनज इत्यादी पदक पटकावले असून ते सध्या पुणे येथे पोलीस हवलदार म्हणून कार्यरत आहेत. तर  त्यांचा धाकटा मुलगा पै.कांतीलाल जाधव हे कामगार केसरी २००६, मल्लसम्राट केसरी २००८, शिवसेना केसरी २०११ येथे कुस्तीमध्ये यश संपादन केले. सध्या ते व्याहाळी येथे जय हनुमान व्यायाम शाळेच्या  वतीने लहान मुलांना तालीम शिकवत आहेत. भारत जाधव हे पैलवान की मधील डॉक्टर असून कुस्ती स्पर्धा किंवा कसरत चालू असताना त्यांनी अनेक घायाळ स्पर्धकाला उपचार करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा त्यांचा खरा गौरव आहे. कौठळी गावचे तसेच भाजपचे इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख पै. साहेबराव  पिसाळ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
close