shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१९७१ च्या युद्धाच्या स्वर्णजयंती निमित्त मनसेतर्फे शहिदांना श्रद्धांजली व माजी सैनिकांचा सत्कार...!


अहमदनगर । प्रतिनिधी :
नाशिक येथे ०३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ असे १३ दिवस पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर चाललेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताला निर्णायक विजय मिळून बांगलादेशची निर्मिती झाली. या विजयाच्या स्वर्णजयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या युद्धात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली व या युद्धात भाग घेतलेल्या माजी सैनिकांचा स्मृतीचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनेचे नाशिक अध्यक्ष विजय पवार, व्ही. एम. देवरे, एम. बी. पवार, एस. पी. बोंबले, डी. एम. कुरकुरे, एम. पी. वाघ, दिपक रोकडे, पळशीकर साहेब, सुबेदार मेजर दिनकर पवार, नायब सुबेदार गोविंद बस्ते, चंद्रशेखर कांबळे, वसंत रत्नपारखी, रामचंद्र मुसळे, चंद्रकांत शिंदे, सुधाकर व्यवहारे, सोपान मुसळे, पियुष चौधरी, लक्ष्मीकांत पारनेरकर या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कै. अरुण एकनाथ पवार यांच्या तर्फे विशाल पवार यांनी तर अशोक एकनाथ पवार यांच्या तर्फे जयदिप पवार यांनी सत्कार स्वीकारला. 
या वेळी सत्काराला उत्तर देतांना श्री विजय पवार, व्ही. एम. देवरे, चंद्रकांत शिंदे यांनी युद्धाचे थरारक अनुभव कथन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी मनसे सर्व प्रसंगी माजी सैनिकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली तर शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सैनिकांच्या देशसेवेचा गौरव करून सर्व देशवाशी सैनिकांसमोर नतमस्तक असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, नाशिक तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, मा. तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, अरुणाताई पाटील, निर्मलाताई पवार, रिनाताई सोनार, अॅड. भाग्यश्री ओझा, डॉ. किरण कांबळे, जयदीप पवार, जनार्दन खाडे, पंकज दातीर, पंकज बच्छाव, सचिन ओझा, डॉ. श्रीकांत भडांगे, मनोज हेमके, सौ. रुपाली हेमके, अंगद चौधरी, देवचंद केदारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
close