अहमदनगर । प्रतिनिधी :
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फोर्ट मुंबई येथे आज दिनांक ३०.१२.२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे संस्थापक अध्यक्ष अॅड डॉ विक्रांत वाघचौरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच नवं वर्षाचे स्वागत करतांना तरूणांनी व्यसन करू नये यासाठी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली, यावेळी सरते वर्ष 2021 हे नशेत साजरा न करता, पूर्ण नशा मुक्त राहून येणारे नवं वर्ष 2022 साजरे करा आणि नवीन वर्षाला नवे संकल्प, नवी ऊर्जा सोबत घेऊन स्वप्नांना उंच भरारी द्या, असा आपुलकीचा संदेश देत, सर्व मुंबईकरांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस श्रीमती वर्षा विलास, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी व मुंबई शहर संघटक नशाबंदी मंडळ श्री अशोकजी लांडगे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री विवेक ज साळवी उपस्थित होते.
यावेळी श्री अशोक लांडगे यांनी व्यसनमुक्तीवर शपथ घेतली व पथनाट्य व पाठगीत सादर करण्यात आली, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष मा श्री डॉ विक्रांत वाघचौरे , राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री बसवराजजी शिंदे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस गणेश वाघचौरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन पाटील, मुंबई विभाग लीगल एड प्रमुख अॅड.अभय सोडिये, नितीन सोनवणे अध्यक्ष पोलीस ग्रीवीयंन्स सेल महाराष्ट्र राज्य ,जब्बार शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र राज्य ,श्री नागनाथ धोत्रे संचालक महाराष्ट्र राज्य, श्री डॉ स्वप्नील माने अध्यक्ष डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

