shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरेगाव येथे लग्न सोहळ्यात सायकलचा आहेर ठरला लक्षवेधी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१


कोरेगाव येथे लग्न सोहळ्यात सायकलचा आहेर ठरला लक्षवेधी..!!


कर्जत : तालुक्यातील कोरेगाव परिसरामध्ये भानुदास गोरे यांच्या परिवारातील मुलाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला सामाजिक, राजकीय, पारमार्थिक, वैद्यकीय व व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
              लग्न सोहळ्यात अनेक उपस्थितांचे लक्ष वेधले ते म्हणजे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वरपिता भानुदास गोरे यांना एक सायकल आहेर म्हणून देण्यात आली त्यामुळे लग्न मंडपातील सर्व मान्यवर व नातेवाईक याच्यात आपापसात चांगलीच चर्चा रंगली. त्याच सायकल वरती नवरदेवाला वरातीत फिरवले. त्यामुळे कुठेतरी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्या सारखं वाटतयं अशी प्रतिक्रिया उपस्थित वृध्द लोकांमध्ये होताना पहावयास मिळाली.

    हा सायकलचा अनोखा आहेर डॉ. शिवाजी शेळके यांनी गोरे कुटुंबीयांना केला त्यामागचा हेतू विचारला असता, लोक आता खूप आळशी झाली आहेत फक्त गाड्यांवर फिरणेच पसंद करतात पण सायकल चालवने म्हणजे शारीरिक व्यायाम होणे आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळवणे, हे साध्य होऊ शकते, असे मत डॉ.शेळके यांनी व्यक्त केले.या विषयाची चर्चा संपुर्ण कर्जत तालुक्यात होत आहे

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close