पडलो नाही अजुनी, लागल्या कितीक ठेचा
चालतो आहे अजुनी, खुंटल्या कितीक वाटा
ध्येय माझ्या उरात आहे, आहे जिवंत अजुनी
मातीचा हा सुगंध, आहे स्वासात जपुनी
जात ना पुसावी, आहे माणुस अजुनी
मरण यावे स्मरुणी, डोळ्यात हास्य ठेवुनी
राञीचा सुर्य फुलावा, दिस उगावा चंद्र बनुनी
गाव तो वसावा , प्रेमाचे घरटे बांधुनी
धरतीचे अंबर व्हावे ,अंबरात बाग फुलावी
गाव तो बुडावा, पांखरांची गाणी गाऊनी
करुणेचा सागर वहावा, बुध्दांची वाणी होवुनी
आकाश सुपारे
9822510254

