shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फरार आरोपी मकासरेला अखेर दोन दिवसांची पोलिस कोठडी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१        

राहुरी : राहुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरी,शस्राचा  धाक दाखवणे   गुन्ह्यातील फरार आरोपी विजय मकासरे याला सोमवार दि.६ डिसेंबर रोजी अटक होवून राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले.राहुरी न्यायालयाने आरोपी मकासरेला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  
  
      दि.६ ऑगष्ट २१ रोजी आरोपी विजय अण्णासाहेब मकासरे याने राहुरी येथिल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत  शस्राचा धाक दाखवत रोख रक्कम व ऐवज लुट केली होती.त्या घटनेची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

@मुन्नाभाईची चौकशीची मागणी....

मकासरे याने प्रसार माध्यमातून वेळोवेळी डॉक्टर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याच्या डॉक्टर पदवीची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अ.भा.छावा संघटना व मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आरोपी विजय मकासरे याच्याकडे डॉक्टर असल्याचा दाखला नसेल तर अजून एक गंभीर गुन्हा दाखल होवून अडचणी मध्ये वाढ होवून जेलचा प्रवास वाढू शकतो.
       सदर आरोपी विजय अ.मकासरे यांने जिल्हा न्यायालय व त्या नंतर औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता;परंतु दोन्ही ठिकाणी अटकपूर्व अर्ज ना मंजूर करण्यात आलेला होता.फिर्यादी देवेंद्र लांबे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अड.वैभव मोहनराव पवार तर उच्च न्यालयात अड.विवेक तारडे यांनी काम पहिले होते.
    याच दरम्यान आरोपी विजय अ.मकासरे याने औरंगाबाद खंडपीठात दि.१३ ऑक्टोंबर २१ पर्यंत स्वतः राहुरी पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी अर्ज केला होता.
परंतु आज दि.६ नोव्हेंबर २१ पर्यंत आरोपी विजय अ.मकासरे हा फरार होता.तपासी अधिकारी उप.पो.नि.तुषार धाकराव हे तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.सध्या तपासी अधिकारी धाकराव रजेवर असल्यामुळे उप.पो.नि.मधुकर शिंदे हे काम पहात आहेत.
 आरोपी विजय मकासरे याच्यावर आत्तापर्यंत विविध पोलिस ठाण्यात बलात्कार,फसवणूक,सरकारी कामात अडथळा आनने,शास्राचा धाक दाखवून मारहाण करणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.प्रत्येक गुन्हयात आतापर्यंत आरोपी विजय मकासरे याने मोठ्या शिताफीने जामीन मिळवून समाजामध्ये उथळ माथ्याने फिरत होता.
वेळोवेळी अनेक गुन्हयात आरोपी असून देखील जामीन मिळाल्याने कायद्याचा धाक आरोपी मकासारेला राहिलेला नव्हता.आरोपी कायम या-ना त्या कारणाने कायम स्वतःला चर्चेत ठेवून सर्वसामान्य लोकांना फसविण्याचे काम करत आलेला आहे.
आरोपी विजय मकासरे हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेवून प्रतिष्टा मिळविण्याचा प्रयत्न करत आलेला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close