शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१
सोनई :अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अचानक शनिशिंगणापूर येथे येऊन शनीदेवाचे विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कारभार च्या निमित्ताने नेवासा तालुक्याच्या दौऱ्यावर होते, त्यांनी अचानक आढावा घेऊन शनिदर्शन घेतले.
शनिशिंगणापूर देवस्थानचे जनसंपर्क कार्यलयात पोलीस पाटील ऍड.सयाराम बानकर व सोनईचे माजी सरपंच हरिभाऊ दरंदले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील पाणसनाला येथील सुशोभीकरण व विकासप्रकल्प निधीसाठी मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून शनिभाविकाना शनिमंदिरापर्यंत सुरक्षितपणे पोहचता येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांना ऍड.बानकर यांनी बोलताना सांगितले.
देवस्थानचे वतीने सरचिटणीस आप्पासाहेब शेटे व पत्रकार विजय खंडागळे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा शाल,श्रीफळ,देऊन सन्मान केला.
पोलीस ठाण्याला जास्तीची जागा मागू शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्याचा कारभार पाहण्यासाठी येथील जागा कमी पडत असल्याने ना.शंकरराव गडाख यांच्याकडे मी विशेष प्रयत्नातून वाढीव जागेचा प्रश्न सोडवणार असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,नगर यांनी सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

