प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : १४ / दि . १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील मराठा मंदिर इंडोर हॉल मध्ये , नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत , युथ आयकॉन फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या युथ कराटे फेडरेशन ने सर्वोत्कृष्ट टीम चे खिताब मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये चुरशीची लढत पहावयास मिळाली. या ऑल इंडिया कराटे स्पर्धे मध्ये भारतातील एकूण २९ राज्यातील ३७० खेळाडूंनी. सहभाग नोंदवला. या मध्ये महाराष्ट्र संघाने सर्वात जास्त स्वर्ण पदक जिंकत विजेतेपद पटकावले. तर पंजाब आणि तेलंगणा ने देखील चुरशीची लढत देत. दुसऱ्या क्रमांकाचे मान मिळवले. विशेष म्हणजे महाराष्ट्र संघाच्या या विजयी लढ्यात अहमदनगर च्या १२ खेळाडूंनी समभाग नोंदविला आणि. ६ स्वर्णपदक , ९ रौप्यपदक , तर ७ कांस्य पदकांची कमाई करत. महाराष्ट्र संघाच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली.
यामध्ये झारा शेख (२ स्वर्ण) , आलिया सय्यद (१ स्वर्ण १ रौप्य) , याहया सय्यद (१ स्वर्ण १ रौप्य) , हुझेफ शेख १ स्वर्ण १ कांस्य) अरकम सय्यद (२ रौप्य) , अब्दुल्ला सय्यद (२ रौप्य)
अब्दुल्लरहमान सय्यद (१ रौप्य १ कांस्य ) , अरफा शेख (२ रौप्य) अरिबा शेख (१ कांस्य) , आसरार सय्यद (१ रौप्य ) माही शेख (१ कांस्य) , मोहम्मद तासीन सय्यद (२ कांस्य) हे अहमदनगर संघातील विजेत्यांची नावे आहेत.
या उत्कृष्ट कामगिररीची दखल घेत अहमदनगर च्या युथ कराटे फेडरेशन चे आयोजक समिती कडून भरभरून कौतुक करत. उत्कृष्ट टीम सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी ऑल इंडिया कराटे स्पर्धा आयोजक समितीचे शिहान अरुण पाईकडे , प्रमुख पाहुणे आमदार अंबादास दानवे , नितिन सूर्यवंशी , आदी मान्यवरांनी अहमदनगर चे आंतरराष्ट्रीय कराटेपटू आणि कोच सबील सय्यद , आणि साहिल सय्यद यांचे भरभरून कौतुक केले.
गेली काही वर्षे सबील सय्यद आणि साहिल सय्यद हे युथ कराटे फेडरेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्याच सोबत युथ आयकॉन फाउंडेशन कडून विविध सामाजिक उपक्रम अंतर्गत महिलांना आणि मुलींना मोफत स्वरक्षणाचे धडे दिले जातात !
अहमदनगर शहरातील सर्वच विजेत्या खेळाडूंचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

