शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
एसटी कर्मचार्यांना शेवटचा अल्टीमेटम, अन्यथा...!!
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्यांचा संप काही संपण्यांची चिन्हे नाहीत. राज्यातील काही डेपोमध्ये कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी, काही कर्मचारी अद्यापही कामांवर हजर झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला असून, कर्मचार्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर झाले नाही, तर कठोर निर्णय घेण्याचे संकेत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले आहेत.
सोमवारनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. आधी निलंबन, त्यानंतर त्याची चौकशी होईल. त्यानंतर प्रशासन ठरवतं की त्याला बडतर्फ केलं जाईल की सेवेत घेतलं जाईल. माणुसकीच्या दृष्टीने अजून एक संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यानंतरही कामगार आले नाहीत, तर त्यानंतर मेस्मा किंवा इतर कोणती कारवाई करायची, याविषयीचा निर्णय घेतला जाईल. सोमवारपर्यंत मेस्मा संदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे अनिल परब म्हणाले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

