शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
शोषितांचे श्रमाच्या घामावर प्रस्थापितांच्या हवेल्या - दत्ता कडू पाटील..!!
देवळाली प्रवरा : शोषितांचे श्रमाच्या घामावर प्रस्थापितांच्या हवेल्या उभ्या राहिल्या असे देवळाली प्रवरा येथील माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर आज लिहिलेल्या गांवगाडा सदरात म्हंटले आहे.
कडू पाटील पुढे लिहताना म्हणतात की, सकाळी हेल्फ टीम कार्यालयात समोर आलेल्या काही नागरिक , युवक यांचे प्रश्न काहींचे नोकरीचे तर काहींच्या व्यवसायीक अडचणी. आमच्यापरिने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असतो आमचा. आम्ही प्रामाणीक प्रयत्न केले असं वाटले समोरच्याला. तरी आपलं समाधान होत असते भीम आर्मी संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाताई चावरे या कामानिमत्त भेटल्या.त्यांचे कुटुंबांचा न् माझा खुप जुना परिचय , त्या मुळच्या गंगापुरच्या. त्यांची आई बसस्टॅडच्या स्वच्छतागृहात काम करत असतं. औरंगाबादला इंजिनिअरींगला शिकत असताना बसने प्रवास किसन फुलारे आमचे मित्र त्यांचे मेव्हणे. किसनच्या पत्नी काही निरोप चिठ्ठी काही वस्तु माझेजवळ द्यायच्या.त्या मी गंगापुर स्टॅडवर त्यांचे आईला द्यायचो , त्यांचे आई परतीच्या प्रवासात पाचपन्नास रुपये लेकींला द्यायच्या त्या मी किसनच्या घरि पोहच करायचो. उद्या त्यांचा सफाई कामगारांचा मोर्चा आहे नगरपरिषदेवर. मुन्नाभाभी तश्या अल्पशिक्षित. परंतु नेतृत्वगुण ठासुन भरलेले, सफाई कामगारांचे प्रश्नावर जिल्हाभर मोर्चे. कलेक्टर काय मंत्र्यांना भिडणा-या मुन्नाभाभी, त्या कुणाची भिडभाड ठेवत नाहीत. जे आहे ते रोखठोक.
मोर्चा आहे मग मागण्या काय आहेत. त्यांनी मागण्याचे निवेदन दिले. त्यातील एका मागणीने माझे लक्ष वेधले, कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे. तसं पहाता तो त्यांचा हक्क आहे. परंतु तो हक्क डावलला तर तो कसा मिळावयाचा याबाबत भीमआर्मी आहे. परंतु देवळालीकरांनो आपल्या नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचा विषय थोडा वेगळा आहे. हे कंत्राटी कामगार नगरपरिषदेकडे कामाला नाहीत. हे गेली चार वर्ष कामाला आहेत त्या कंपन्यांकडे ज्यांनी देवळालीच्या एकुण बारा कामांचे घनकचरा व्यवस्थापनाचे काम घेतले आहे.वार्षिक १५ ते १६ लाख खर्च असलेला या कंपनीला काम देताच तो सरासरी दीड कोटी प्रती वर्ष झाला.चार वर्षाचा खर्च आहे ५,९८,००,०००.पाच कोटी अठ्ठ्यानव लाख. या कंपनी करत असलेल्या बारा कामांची यादी मी आपणांला देत आहे.ती कामे वाचा. तुमच्या भागात हि कामे झाली आहेत कि आताहि नियमित होत आहे.तुमचे तुम्हांला विचारा. आता दीड कोटीचे घनकच-याचे काम म्हणजे महिन्याला साडेबारा लाख. मग एवढे काम करायला किती यंत्रसामुग्री न् कामगार लागत असतील. तुमच्याकडे करतात ना मजुर हजेरीवर कामे. त्यावरुन गुणाकार भागाकार करा.
माझे माहितीनुसार नगरपालीकेच्या कचरागाडया न् काही कर्मचारी ते वापरतात. कचरागाड्याचे भाडे मिळत असेल करारात आहे तसे. पण नगरपरिषदेच्या कायम कामगारांचा पगार पालीका देते कि कंपनी ते पहा तुम्ही तपासुन. कंत्राटी कामगार आहेत पन्नास त्यांना २०० रुपये रोज दिला जातो. पन्नास कामगारांचा दररोजचा पगार १००००. महिन्याचा ३ लाख.मशीनरी भाडे डिझेल औषधे २ लाखाची धरा. ५ लाख खर्चावर १२.५ मिळतात. चांगला नफा कंपनी कमावते.मग या गरिबांनी कामगार कायद्यानुसार किमान वेतन द्यायला त्यांना काय अडचण आहे. गोरगरिबांचे शोषणांवर प्रस्थापितांच्या हवेल्या उभ्या रहातात. अगदी हे गरिब घाणीच उतरतात. तुम्ही केलेली घाण उचलतात. त्यांचे श्रमावर देशभर मिरवता. त्यांचे घामाचे दाम कुणी द्यायचे.
मुख्याधिकारी महोदय म्हणतात आम्ही फक्त कामांची क्वांटिटी पहातो. त्याने किती मजुर लावले न् काय यंत्रसामुग्री वापरली यांचेशी आमचे घेणेदेणे नाही. ५० मजुर न् चारपाच घंटागाड्याचे १२.५ लाख महिन्याला मोजता.हे तुम्ही पहायला नको का. नगरपरिषदेचा पै न् पै नागरिकांचे कराचा पैसा आहे. तो नीट वापरला गेला नाही पाहिजे का. तुमचे कर्मचारी फुकट कंपनीकडे राबतात कि कसे हे कोण पहाणार. तुम्ही पालक आहात ना. कारभारी कुटुंब प्रमुख आहेत ना. या गोरगरिब आबालवृध्द कामगारांना किमान वेतन मिळते कि नाही हे कुणी पहायचे. ती तुमची जबाबदारी आहे. नाहीतर कंपनीबरोबर तुमची मिलीभगत आहे. असा आम्हां पामरांचा समज व्हायचा.
उद्या या प्रश्नांची तड लागली नाहीतर हा प्रश्न कामगार राज्यमंत्री ना श्री बच्चु कडुंना गावांत आणुन सोडविण्याचा मी प्रयत्न करेल. आतापासूनच किमान वेतन आहे. तर त्यांचे गेल्या पाच वर्षात जे शोषण या कंपन्यांनी केले त्याचा फरक त्यांना मिळावा अशी आमची आग्रही मागणी आहे. अहो पन्नास कामगार तुम्ही नगरपरिषदेने कंत्राटी कामावर घेतले. मशिनरी तुमची. घनकचरा डेपो आहे.किती पैसे वाटतील कमीत कमी १ कोटी. पहा देवळालीकरांनो काही उलगडा होतो कि नाही या विषयाचा. आणखी एक उलगडा आम्ही तुमच्या करता करु काहि दिवसात.तोपर्यत वाचा. पटले तर कामगारांनाचे पाठीशी उभे रहा. ते तुम्ही केलेली घाण ते स्वच्छ करतात. तुर्त एवढे. #गांवगाडा.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

