shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छञपती राजर्षी शाहु बँकेचे मतदान शांततेत ; रमेश आडसकर व अर्चनाताई आडसकर यांच्यासह सभासदांनी केले मतदान.!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-


बीड जिल्हासह अवघ्या महाराष्ट्रात स्वकतृत्वाने भरारी घेतलेल्या श्री छञपती राजर्षी शाहु अर्बन को- आॕपरेटीव्ह बँकेचे मतदान रविवारी सकाळी आठ ते चार यावेळेत शांततापुर्ण वातावरणात संपन्न झाले.यावेळी भाजपाचे जेष्ठनेते श्री रमेशराव आडसकर व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई आडसकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केले. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शाहु बँकेच्या सभासदांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.मतदान गटसाधन केंद्र केज येथे मतदान केंद्र  होते. 





गटसाधन केद्रांमध्ये तीन बुथ तयार करण्यात आल्यामुळे मतदान सुरुळीतपणे पार पडले एकुण साधारणपणे १२०० मतदानापैकी ७६० मतदार सभासदांनी मतदान केले .यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सकाळी मतदानाचा वेग चांगला होता.लग्नाची तारीख असल्यामुळे दुपारी संथगतीने मतदान चालु राहीले.परंतु तीन वाजल्यापासुन मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करुन एकुण ७६० मतदान   एवढे मतदान केले .या निवडणुकीचा निकाल दिनांक २८-१२-२०२१ रोजी लागणार असुन निकालाकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे

close