shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपाच्या 30 ते 40 कार्यकर्तेंनी साक्री (धुळे जिल्हा) नगर पंचायतीला उभा राहिला म्हणून उमेदवाराच्या बहिणीची केली निर्घृण हत्या..!


अजून किती भटक्या समाजावर हल्ले होणार..?


प्रतिनिधी । मोहन शेगर :-
साक्री । निष्पाप गरीब नाथपंथी डवरी गोसावी (भटक्या व विमुक्त जाती जमाती) समाजाची महिला मोहिनी नितीन जाधव वय वर्ष 30 यांचा भाऊ नगर पंचायतला उभे का राहिला म्हणून काल मोहिनीची निर्घुणपणे साखरी शहरातील भाजपचा नगराध्यक्ष अग्रवाल व 30 ते 40 भाजपच्या कार्यकर्त्यांनी व गुंडांनी निर्घुणपणे हत्या केली.

मयत मोहिनी नितीन जाधव

मिळालेल्या माहितीप्रमाणे बचावासाठी मोठ्या-मोठयाने मोहीनी आरडाओरडा करत होती. परंतु या नराधमाने या महिलेचे पाय खेचून फरफटत भर चौकात दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी जागेवरच जीवे ठार मारले.

हा केवढा मोठा अन्याय भटक्या-विमुक्तांच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजावर चालला आहे. म्हणजेच भटक्या ‌विमुक्तांना या स्वतंत्र भारतामध्ये खरे स्वातंत्र मिळाले आहे काय..?? काय नुसतेच भारताचे अन्याय सहन करण्यासाठी नागरिक आहोत का हे खरंतर गंभीर स्वरूपाचा प्रश्न उभा राहिला आहे ..??

यापुर्वी धुळे जिल्हा राईनपाडा मध्ये निष्पाप पाच तरुणांना या जाती वादातून आपले प्राण गमवावे लागले होते. त्याचीच पुनरावृत्ती  आत्ताही झालेली आहे.

अत्यंत संतापजनक व तीव्र निषेध करणारी ही घटना आहे. खरंच आपण मागील राईनपाडा घटने त्यासंदर्भात गंभीरतेने कदाचित लक्ष घातलेले नसावे. म्हणूनच परत या जिल्ह्यात याच घटनेची पुनरावृत्ती या निमित्ताने झाली आहे. जर असे आपल्या निष्पाप बांधवांना व महिलांना दगडाने ठेचून जीवे ठार मारले जात असेल तर अशा नराधमांना कठोरात कठोर मरेपर्यंत फाशीची शिक्षेची कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी नाथपंथी डवरी गोसावी समाजातून तसेच भटक्या विमुक्त संघटना कडून होत आहे.
close