shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परंडा तालुका पोलिस स्टेशन मधील महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती कागदे यांची पोलीस नाईक पदी बढती


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

   परंडा: दि. २० /  परंडा तालुका पोलीस स्टेशन येथील महीला पोलिस कॉनस्टेबल श्रीमती कागदे  यांची नुकतीच पोलीस नाईक पदी बढती झाली.

 परंडा पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा नुकताच पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व पोलीस रिपोर्टरचे डिव्हीजनल हेड बाबर मशायक यांच्या हस्ते सत्कार पोलिस ठाणे परंडा येथे करण्यात आला.

 या वेळी परंडा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस नाईक निकम यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारून नविन महीला पोलीस नाईक  कागदे यांनी कामास प्रत्यक्ष सुरुवात केली.

   या कार्यक्रमास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी महिला पोलिस हवालदार सौ लोहार मॅडम , हे.कॉ. गीरी मॅडम, महिला पोलिस नाईक पायाळ मॅडम, पो.कॉ, वडदरे मॅडम, शेळके मॅडम इत्यादी. उपस्थीत होते यावेळी महिला पोलीस हवालदार शबाना मुल्ला मॅडम यांच्या हस्तेही नवनिर्वाचीत महीला पोलीस नाईक कागदे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व पोलीस रिपोर्टर चे डीव्हीजनल हेड बाबर मशायक आदी सर्वांनी म.पो. ना. कागदे मॅडम यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
close