नगराध्यक्षा अंकिता शहा यांची भेट घेत गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवर सकारात्मक चर्चा - काँग्रेस चे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरात नव्याने सुरु होत असलेल्या श्री छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेत काँग्रेस पक्षाने विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. त्यात प्रामुख्याने भाडे कमी करणे, घरपट्टी गाळेधारकाने न भरता नगरपालिकेने भरणे, कराराचे वर्षे वाढवणे, स्थानिकांना प्राधान्याने देणे, दर गळ्याच्या बोली साठी जी २० हजाराची अट आहे ती शिथिल करणे व गाळ्यासमोर अतिक्रमण होणार नाही याची हमी नगरपालिकेने देणे इत्यादी मागण्यासाठी काँग्रेस अग्रेसर होती. त्यासंदर्भात
आज(दि.१९) रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा अंकिता शहा यांची भेट घेतली काँग्रेसने केलेल्या मागणीची विचार करत दर गाळ्या च्या बोलीला २० हजार रुपयाची डिपॉझिट ची मागणी रद्द करून ३० हजार रुपये भरून अनेक गाळ्याच्या बोली बोलण्याचे साठी अनुमती देण्यात आली असून शंभर फुटी रोड वरील सर्व अतिक्रमणाची ची जबाबदारी घेत अतिक्रमण काढलेले आहे.असल्याची माहिती सावंत यांनी सांगितले
काँग्रेसने केलेल्या मागणीतील प्रमुख मागणी दर महा असणारे भाडे कमी करण्याची मागणीसाठी ताबडतोब प्रांत साहेब आणि टाऊन प्लॅनिंग कडे पत्र व्यवहार करू असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिली असल्याचे माहिती तसेच.या बैठकीत एक फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया किचकट असल्याचे निदर्शनास आणून दिल्या नंतर फॉर्म भरण्याची मुदत वाढ देण्याच्या संदर्भात उद्या निर्णय घेऊ असे मत नगरसेवक भरत शेठ शहा यांनी मांडल्याची माहिती सावंत यांनी दिले
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्यासह , इंदापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चमन भाई बागवान , जिल्हा सरचिटणीस जकिरभई काजी, सचिव महादेव लोंढे, खजिनदार भगवान पासगे इत्यादी उपस्थित होते.

