shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहा येथे ऊसतोड कामगारांना फिरत्या दवाखान्या मार्फत मोफत आरोग्य सेवा

शहा येथे ऊसतोड कामगारांना फिरत्या दवाखान्या मार्फत मोफत आरोग्य सेवा.

शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना गेल्या 2 वर्षांपासून राबविण्यात येत आहे.

इंदापूर प्रतिनिधी:शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखाना ही संकल्पना गेल्या 2 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आज शंकररावजी पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामपंचायत शहा, सरडेवाडी या भागात प्रत्यक्ष शेतावरती जाऊन ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केली.
या प्रसंगी बोलताना शहा गावच्या ग्रा.पं सदस्या व इंदापूर तालुका महिला दक्षता कमिटीच्या सदस्या जयश्रीताई खबाले म्हणाल्या की ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोफत आरोग्य सेवा सुरू आहे. आज शहा गावामध्ये पाच ठिकाणी ऊस तोडणी मुजरांच्या टोळ्या आहेत त्या सर्वांची आरोग्य तपासणी केली.आरोग्याच्या बाबतीत ऊसतोड मजुरांना येणाऱ्या अडचणी या फिरत्या दवाखान्या मुळे सुटत असून मजुरांना जागेवरती मोफत उपचार मिळत आहेत. यामुळे ऊसतोड मजुरांचा व वाहन मालकांचा वेळ व पैस्याची बचत होत आहे. कर्मयोगी भाऊंनी समाजाची सेवा केली, कष्टकऱ्यांचे प्रपंच उभे केले. त्यांची आज आठवण होत आहे.  शंकररावजी पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांडे, तनुजा गायकवाड, वॉर्डबॉय नितेश बेटकर यासाठी सेवा देत आहेत.
यावेळी जयश्रीताई खबाले, सायरभाभी आत्तार, विद्या ढवळे, हनुमंत ढवळे, शंभू ढवळे, परमेश्वर खबाले, अतुल कडवळे,  महिला व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याकामी कर्मयोगी कारखान्याचे अधिकारी श्री देवकर व त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
close