shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर महाविद्यालयास राज्यस्तरीय उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार


बेलापूर (प्रतिनिधी ) - येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवत्तापूर्ण महाविद्यालय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा क्रिडा कार्यालय अहमदनगर,स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था ,श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालय निमगांव वाघा (ता.नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा पारनेर तालुक्याचे (नगर-पारनेर विधानसभा मतदार संघाचे) आमदार लोकनेते मा. निलेश लंके यांच्या शुभहस्ते व किसनराव डोंगरे बहुउद्देशीय सेवा संस्थेचे सर्वेसर्वा नाना डोंगरे, अहमदनगर लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ.संपूर्णा सावंत,औरंगाबादचे प्रा.शैलेंद्र भणगे,सरपंच अलका जाधव, अलका गायकवाड ,मंदाताई डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.विशेष घटक युवक कल्याण प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय व्यसनमुक्तीवर वक्तृत्व स्पर्धा ,पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, भव्य रक्तदान शिबिर, युवा मतदार जागृती अभियान या निमित्ताने आयोजित केले होते. बेलापूर महाविद्यालयाने रितसर प्रस्ताव सादर केलेला होता. बेलापूर महाविद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष चालू आहे.या २५ वर्षांच्या काळात या महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधकीय,साहित्यिक,काव्यप्रबोधन, सांस्कृतिक,युवक जागृती अभियान पर्यावरण विकास या क्षेत्रातील कामकाज राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, सांस्कृतिक विभाग, वाड.मय व वाणिज्य मंडळे,तसेच ३५ विविध समित्यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाने केले आहे.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट एकक महाविद्यालय जिल्हास्तर पुरस्कार मिळालेला आहे. निशा आढाव या विद्यार्थीनीस उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार मिळालेला आहे.पल्लवी टाकसाळ या विद्यार्थीनीने वाणिज्य शाखेत तृतीय वर्षासाठी तीन विषयात प्रथम क्रमांकाची पारितोषिक मिळवलेली आहेत. या महाविद्यालयाचे तीन माजी विद्यार्थी पी.एस.आय.झालेले आहेत बहुतांश विद्यार्थीनी महाराष्ट्र पोलिस दलात निवडल्या गेल्या आहेत.विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक झाले आहेत,सेट पास झाले आहेत तर काहींनी संशोधन करुन एमफिल पीएच.डी पदवी मिळविली आहे.बॅकिंग अॅण्ड फायनान्स,उद्योग,व्यवसाय,ग्रंथपाल, पत्रकारीकता क्षेत्रात कार्यरत आहेत.काहींनी सरपंचपद सांभाळले आहे तर काहींनी वकिलीच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.तर काही विद्यार्थी राजकारण, समाजकारण,अर्थकारण या क्षेत्रात धडाडीने काम करीत आहेत.काही विद्यार्थी किर्तनकार व प्रवचनकार झाले आहेत. काहींनी एम.एस.डब्ल्यू.करुन विविध संस्थांमधे ते आपले योगदान देत आहेत. या महाविद्यालयाचे विभागीय कामकाज पाहून बंगलोर येथील नॅक कमिटीने महाविद्यालयास "बी" ग्रेड मानाकंन दिले असून सी.जी.पी.ए.२.२४ आहे. महाविद्यालयात एक प्रोफेसर,तीन सहयोगी व बारा सहायक प्राध्यापक आहेत.त्यांची पुस्तके प्रकाशित असून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित असून त्यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयाला राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके ,सचिव अॅड. शरद सोमाणी, सहसचिव दीपक  सिकची,खजिनदार हरिनारायण खटोड,विश्वस्त नारायणदास सिकची,सुरेश मुथ्था,प्रेमा मुथ्था, श्रीकृष्ण भालेराव,श्रीवल्लभ राठी, हरिश्चंद्रपाटील महाडिक , राजेंद्र उर्फ नंदूशेठ खटोड, बापूसाहेब पुजारी ,लीलावती डावरे,शेखर डावरे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,भरत साळुंके, रविंद्र खटोड,राजेंद्र सिकची,सौ.सुविद्या सोमाणी,अॅड.विजय साळुंके, प्रा.हंबीरराव नाईक,शिक्षक प्रतिनिधी उपप्राचार्या सुनिता ग्रोवर आदींनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे तसेच सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.अॅड.शरद सोमाणी यांनी महाविद्यालयाची अशीच गुणवत्तापूर्ण घोडदौड चालू रहावी असे सांगून शुभेच्छा दिल्या आहेत.
close