पूर्णा । प्रतिनिधी :- महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसा, वाहतुकीस आळा बसविण्याकरिता एकापाठोपाठ एक कारवाईची मोहीम हाती घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
19 जानेवारी बुधवार रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या आदेशाने नायब तहसीलदार नितिशकुमार बेलोरकर यांच्या नेतृत्वात पेनुर गोदावरी नदी पात्रात धडक कारवाई करत नदीपात्राच्या विस्तीर्ण परिसरातील तराफ्याचे जाळे कापून काढले. तसेच दहा मोठया आकाराचे तराफे जाळून नष्ट करण्यात आले, दरम्यान अवैध वाहतूक करणारी ट्रॅकटरची ट्राली जप्त करून ती तहसील कार्यालय पूर्णा येथे लावण्यात आली.
या कारवाईत तलाठी वैजनाथ आमदरे, वाहन चालक नंदकुमार शेलाटे, कोतवाल मुर्लीधर मोरे, शिवप्रसाद देवणे ,श्रीधर गडगीळे,नामदेव कळसाईतकर, साईनाथ दाढे आदी सहभागी होते.

