shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाना पटोले याच्यावर गुन्हा दाखल व्हावा भाजपा ओबीसी मोर्चाचे मागणी

नगर । प्रतिनिधी :-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शिव्या तसेच मारहाण ही करू शकतो असे बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या विषयाचे निवेदन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. योगेश अण्णा टिळेकर, आमदार  श्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्री सुजय दादा विखे पाटील जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र गोंदकर पा. यांच्या सुचनेने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  श्री. बाळासाहेबजी गाडेकर व जिल्हाउपध्यक्ष श्री अशोक भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थित तशेच तालुक्षध्यक्ष श्री स्वानंद (भैय्या) रासने यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने आज शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गुलाबाराव पाटील साहेब यांना देण्यात आले.

तसेच लोणी येथे भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री यांनीही लोणी पोलीस स्टेशनं येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसह निवेदन दिले.

यावेळी बोलतांना भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर म्हणाले कीं भंडारा गोंदिया येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले असता स्थानिक लोकांशी चर्चा करताना आवेशात येऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊ शकतो तसेच मारु हीं शकतो असे वक्तव्य करून देशाच्या पंतप्रधान पदाची गरिमा घालवणारे तसेच मोदीजींचा अपमान करणार हे वक्तव्य आहे. देशाता अराजकाता माजावण्याचा काँग्रेसचा डाव आहे.

 याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने म्हणाले कीं आपण सर्वांनी बघितला असेल की गेल्या पाच तारखेला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे विकास कामांच्या लोकार्पण यासाठी पंजाबीचे गेले असताना काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी यांनी स्थानिक काँग्रेस गुंडांना शेतकऱ्यांच्या नावाखाली बसून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जाणून बुजून रस्ता आडवला तसेच त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल असे कट कारस्थान रचले त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्याचा निषेध करणे सोडून काँग्रेसच्या राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी,  नाना पटोले यांनी पंतप्रधानांची टिंगल वाढवण्यास सुरुवात केली. यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी किती तिरस्कार भरलेला आहे हे लक्षात येते. पंतप्रधान मोदीजींच्या घातपताचा कारस्थान काँग्रेस व नाना पटोले यांनी आखला आहे त्याचा आम्ही निषेध करतो.

देशातील गुप्तचर संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या जीविताला धोका आहे असा अहवाल गृह विभागाला सादर केला आहे. देशाची सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून आपण जिंकू शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण निवडणूक करू शकत नाही, आणि आपल्याला सत्ता मिळणे शक्य नाही  म्हणून पंजाब मध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा हा त्याचा डाव होता का ही शंका वारंवार जनसामान्यांच्या मनात निर्माण होते त्याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो हें जे विधान केले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घातपाताचा एक भाग आहे का याची तपासणी राज्याच्या गृह विभागाने करावी. तसेच विविध वृत्तवाहिन्यांनी व भंडारा जिल्ह्या पोलीस दलाने सदरच्या गावांमध्ये जाऊन नाना पटोले सांगत असलेले मोदी नावाचा गावगुंड कोणीही नसून पटोले हें खोटं बोलत आहे. असे पुराव्यासह सिद्ध केले आहे.

 सदर प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर ओबीसी मोर्चाचे प्रभारी श्री अशोका पवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुक्षध्यक्ष श्री स्वानंद (भैय्या) रासने भाजपा पदाधिकारी श्री धनंजय पाटील सरचिटणीस श्री भिमराज मुर्तडक, श्री योगेश बढे, युवा शहराध्यक्ष श्री वैभव शिंदे, श्री कैलास खोंडे, श्री रावसाहेब कडलग, श्री रघुनाथ कातोरे, श्री सुनिल गाडेकर, श्री दिपक आव्हाड, श्री संजय जगताप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
close