नगर । प्रतिनिधी :
शिर्डी संस्थानचे अध्यक्ष कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा जिल्ह्य़ात जल्लोष शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला असून राज्याच्या विधी व न्याय विभागाने याबाबतचा आदेश आज रोजी पारित केला आहे.
या आदेशानुसार आ.आशुतोष काळे यांना आज रोजी पासून म्हणजेच १९ जानेवारी २०२२ पासून राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झालाय.यानुसार आ.काळे यांना राज्यमंत्र्याच्या सर्व सोयी सुविधा , मानधन , कार्यालय , शासकीय वाहन व स्टाफ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निधीमधून हा सर्व खर्च करण्यात येणार आहे.
आ.काळेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे तसेच आघाडी पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून व जिल्ह्यातील सर्व नेत्यांकडून काळे यांचे अभिनंदन केलं जातंय. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदासोबत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याबद्दल आ.काळेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार व महाविकास आघाडी सरकारचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले आहे.

