नगर । प्रतिनिधी :
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स महाराष्ट्र राज्य व आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद क्रांती मैदान फोर्ट मुंबई येथे दिनांक १४ जानेवारी २०१७ रोजी तृतीय पंथीय बांधवांना मूलभूत अधिकार मिळावे यासाठी शासकीय योजने अंतर्गत तृतीय पंथीयांचे वृद्धा आश्रम , अनाथ आश्रम, मतदान नोंदणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शासकीय नोकरी व शालेय आरक्षण या मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाला जाहीर निवेदन देवून वरील विषय आद्यक्रमाने मान्य व्हावे यासाठी मागणी करण्यात आली होती, तसेच सदर मागणी पूर्ण होण्यासाठी आझाद क्रांती मैदान ते मंत्रालय मुंबई पर्यंत पायी "गुलाबी रॅली" चे आयोजन करण्यात आले होते. सदर मागणीला दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी यश मिळाले असून , सदर मागणी महाराष्ट्र राज्य शासनाने मान्य केली आहे.
सदर तृतीय पंथीयांचे मतदान अधिकार प्रदान करून त्यांची नावनोंदणी देखील करण्यात आली आहे, तसेच तृतीय पंथीयांचे अनाथाश्रम, वृद्धा आश्रम असे अनेक प्रकल्पांना सामाजिक न्याय विभाग व महाराष्ट्र शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.
यावेळी श्री ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी सांगितले की, तृतीय पंथीयांना सर्व हक्क अधिकार व सोयी उपलब्ध त्यांच्या उतार वयात उपलब्ध झाल्याच पाहिजे, कारण त्यांच्या शरीरात लिंग अपूर्ण विकसित असल्याने त्यांना दुय्यम वागणूक हे त्यांच्या हक्क अधिकारांचे उल्लंघन आहे, ते हि जिवंत सजीव मानव आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. असे सांगून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ विक्रांत वाघचौरे यांनी सर्व तृतीय पंथीय बांधवांना आपुलकीचा संदेश देत, सर्व मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस श्रीमती वर्षा विलास, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी संस्थापक अध्यक्ष आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई श्री अशोक लांडगे , महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी उपस्थित होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री बसवराजजी शिंदे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस गणेश वाघचौरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन पाटील, मुंबई विभाग लीगल एड प्रमुख अॅड.अभय सोडिये, नितीन सोनवणे अध्यक्ष पोलीस ग्रीवीयंन्स सेल महाराष्ट्र राज्य ,जब्बार शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र राज्य ,श्री नागनाथ धोत्रे संचालक महाराष्ट्र राज्य, श्री डॉ स्वप्नील माने अध्यक्ष डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

